Sambhajinagar : नवीन पाणीपुरवठा योजनेचे सव्वा दोन वर्षात केवळ ६६ टक्के काम

water
waterTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करताना जायकवाडी धरणात वन्य जीव विभागाने उशिरा परवाना दिल्याने जायकवाडी धरणात जॅकवेलच्या कामात उशिर झाल्याने योजनेस विलंब झाल्याचा ठपका वन्य जीव विभागावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी "टेंडरनामा" प्रतिनिधीशी बोलताना ठेवला आहे. दुसरीकडे या योजनेबद्दल संपूर्ण शहरात तक्रारींचा पाढा वाढला आहे. योजनेतील संथगती कारभारावर न्यायालयाने देखील कंत्राटदारावर ताशेरे ओढले असून ७ जुन रोजी कंत्राटदाराला कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करायचे आदेशित केले. यावर ७ जुन रोजी सुनावणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

water
Mumbai : 'या' अत्याधुनिक तंत्रज्ञानाने कोस्टल रोडचे बोगदे होणार वॉटर प्रूफ

नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करताना काही लोक जलवाहिनी टाकू देत नाहीत, कामाची अडवणूक केली जाते, तर कधी मनुष्यबळ आणि निधीचा तुटवडा, असा पाढा कंत्राटदाराने प्रशासनापुढे  कंत्राटदाराकडून सुरू केला जात होता. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात दिपक कोळी या तरूण कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती झाल्यानंतर गेल्या वर्षभरात या योजनेचे केवळ ६६ टक्के काम पूर्ण झाले आहे. कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीला ४ फेब्रुवारी २०२४ ला योजनेच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. ३ फेब्रुवारी २०२४ ला या प्रकल्पाची मुदत संपली तरीही केवळ ६६ टक्केच काम पूर्ण झाले आहे. आता या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी  कंत्राटदाराला एक आणखी एक वर्षाची मुदतवाढ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडुन देण्यात आली आहे.३१ डिसेंबर २०२४ पर्यंत त्याला काम पूर्ण करण्याची मुभा दिली आहे.‌मात्र न्यायालयाने जुलै २०२४ पर्यंत नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची सक्त ताकीद कंत्राटदाराला दिली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात असमान पाणी पुरवठा होणाऱ्या यंत्रणेत बदल करून सर्व भागात समान व पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी ४ फेब्रुवारी २०२१ मध्ये १६४०  कोटी रुपयांच्या समान पाणी पुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले. मात्र वर्षभरातच ही योजना भाववाढीचे कारण पुढे करत २७४० कोटींवर जाऊन पोहोचली. कंत्राटदाराकडून कामात हलगर्जीपणा होत असल्याने नवीन पाणीपुरवठा योजना संदर्भात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. दरम्यान योजनेंतर्गत काहीच काम झाले नव्हते.‌ न्यायालयाच्या कान उघाडणीनंतर कंत्राटदाराने बर्यापैकी कामात सुधारणा करून काम काम सुरू केले. गेल्या सव्वा दोन वर्षात त्याने ६६ टक्के काम केल्याचा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.आता हे काम ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

water
Sambhajinagar : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पाईपांची जाळपोळ सुरूच; मजीप्रा, कंत्राटदार मात्र गाढ झोपेत

असा आहे कामाचा लेखाजोखा

पैठण येथील जायकवाडी धरणातील जॅकवेलचे ५००० घनमीटर राॅफ्ट स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे.‌ काॅलम व व्हर्टिकल वाॅलचे काम सुरू आहे.धरणातील पाणी पाच टक्के शिल्लक असल्याने जॅकवेलचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यात ॲप्रोच चॅनल व‌ इतर कामे सुरू आहेत. ॲप्रोच ब्रीजचे काम ७० % पूर्ण झाले आहे.‌त्यानंतर २५०० मिलि लिटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे काम ३१ किलोमीटर पर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. जवळपास ८२ टक्के काम झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. जलशुध्दीकरणाच्या एरेशन फाऊंटनचे ६१ टक्के काम झाले आहे. जलशुद्धीकरणात दोन फ्लॅश मिक्सर आहेत. त्यापैकी एकाचे काम ७३ टक्के पूर्ण झाले आहे.‌दुसर्यासाठी खोदाई सुरू आहे. त्यानंतर एकुण सहा कॅरिफायर आहेत.‌ त्यापैकी ३ चे काम ९० टक्के झाले आहे. उर्वरित ३ चे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. यानंतर फिल्टर हाऊस क्रमांक - १ चे काम ३९ टक्के झाले आहे. क्रमांक -२ चे २६ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर शुध्द पाण्याच्या संप व पंपगृहाचे काम ४५ टक्के पूर्ण झाले आहे. यातील ४५ टक्के स्थापत्य विषयक कामे पूर्ण झाली आहेत. केमिकल हाऊसचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. कमी उंचीवरील ५० लाख लिटरच्या मुख्य संतूलन टाकीचे काम झाले आहे. जास्त उंचीवरील एक कोटी १५ लाख लिटर मुख्य संतुलन टाकीचे काम ३६ टक्के झाले आहे.नक्षत्रवाडीहून शहराच्या विविध भागातील टाक्यांकडे येणार्या शुध्द पाण्याची माईल्ड स्टोनमधील गुरूत्व वाहिकाचे २६.११ किलोमीटर काम झाले आहे. तशीच दुसरी डंक्ट आयर्न पाइपलाइनचे काम ६३.२३ किलोमीटर पैकी ३६.१३ किलोमीटर पर्यंत अर्थात हे काम ५८ टक्के झालेले आहे. १९११ किलोमीटर पैकी शहरात ७५७ किलोमीटर पर्यंत वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण झाले आहे. यात ११० ते २०० एम.एम. पाइपांचा समावेश करण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत शहरात एकुण ५३ जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. यात ५० जलकुंभ हे उंच आहेत. तर नक्षत्रवाडी, हनुमान टेकडी व देवळाईतील जलकुंभ हे जमीनीवरचे बैठे जलकुंभ आहेत.‌प्राधान्यक्रमाणे हनुमान टेकडी व टिव्हिसेंटर जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. हिमायत बाग, प्रतापगड नगर, दिल्लीगेट, शाक्यनगर, मिसरवाडी, शिवाची मैदान येथील जलकुंभांचे काम पूर्ण झाले असून कंत्राटदारामार्फत तांत्रिक तपासणी सुरू आहे. ज्युबली पार्क जलकुंभाचा वरचा स्लॅब बाकी आहे.‌पारिजातनगर येथील जलकुंभाचे ४२ टक्के काम बाकी आहे.‌ कॅटली गार्डन येथील जलकुंभाचे काम अर्धवट आहे. ५० जलकुंभ उभारण्यासाठी ४७ जागा महानगरपालिकेकडून मिळाल्या आहेत. त्यापैकी इस्लामपुरवाडी, कोयठाणवाडी, गुरूदासनगर येथे अद्याप महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्या नाहीत.‌४७ पैकी ३४ जलकुंभाचे काम कासवगतीने सुरू आहे. कारण मनुष्यबळाची कमतरता असल्याचे कारण अधिकाऱ्यांनी पुढे केले. या व्यतिरिक्त ५६ दलघली ९०० मिलिलिटर व्यासाच्या पाइपलाइनचे ३९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.‌संध्या या जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात २२ दशलक्ष लिटर पाणी वाढल्याचा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. प्रेशरने व मृतसाठ्यातून पाणी उचलता यावे,यासाठी चार हजार एचपीचा पंप जायकवाडी धरणात बसवल्याचे अधिकारी सांगत आहेत.‌त्याची तांत्रिक तपासणी अद्याप बाकी असल्याचेही ते म्हणाले. जायकवाडी, ढोरकीन, फारोळा येथील पंपींग मशिनरीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.फारोळा जलशुध्दीकरण केंद्रातून संध्या ९०० मिलिलीटरच्या जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू आहे.‌मात्र हे जलशुध्दीकरण पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याने २६ एमएलडीचे नवीन जलशुध्दीकरण उभारले जात आहे. संध्या शंभर एमएलडीचे एक व २६ एमएलडीचे दोन जलशुध्दीकरण केंद्रे आहेत.‌हर्सुल येथे पाच एमएलडीचे जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र आडातच नसल्याने पोहर्यात येणार कुठे? असेही अधिकारी म्हणाले.शहरात एकुण ६० हजार ८३० नळजोडण्या द्यायच्या आहेत. त्यापैकी सहा हजार नळजोडण्या दिल्या आहेत.

न्यायालयाने केली कान उघाडणी

१४ मे रोजी न्यायालयाने स्वतः नवीन पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण पाहणी केली. त्यात सकाळी साडेसात ते दुपारी बारा पर्यंत नक्षत्रांची जलशुध्दीकरण केंद्र, मुख्य संतुलन टाक्या, त्यानंतर अशुध्द पाण्याची उर्ध्व जलवाहिनी, जायकवाडी धरणातील जॅकवेलची पाहणी केली. दरम्यान बिडकीन येथे जलवाहिनी टाकण्यासाठी २३ मीटर रूंद जागा लागत असल्याने निलजगाव फाटा ते डीएमआयसी कडून वाहतूक वळविण्यात आली. ‍न्यायालयाने जुलैच्या अखेर नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची ताकीद कंत्राटदाराला दिली. पावसाळ्याआधी जॅकवेल, ॲप्रोच चॅनल व ब्रीजचे काम पूर्ण करा, अशा सुचना देण्यात आल्या.‌कंत्राटदार एक्सपर्ट आहे म्हणून काम दिले त्याने जास्त अडचणी सांगू नयेत.यावेळी न्यायालयाने कंत्राटदाराची चांगलीच कानउघाडणी केल्याचेही अधिकारी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com