टेंडरनामाच्या वृत्तानंतर 'त्या' तीन कोटी ७० लाखांच्या कामांना प्रशासकांकडून स्थगिती

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर "महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद" या गोंड्स नावाखाली याच योजनेअंतर्गत २०२३-२४ या चालु आर्थिक वर्षात  (४२१७-०५४१) या लेखाशिर्षाखाली ४० कोटीचा निधी मंजुर केला. या प्राप्त निधीतून महापालिका प्रशासनाने आधीचेच कोट्यावधींच्या सायकल ट्रॅकचा प्रयोग फोल ठरल्यानंतरही महापालिका प्रशासनाने दिल्लीगेट ते हर्सुल या मार्गावर तीन कोटींचा सायकल ट्रक व झोन क्र. ४ अंतर्गत विविध चौकातील लेफ्ट टर्न फ्री करण्यासाठी तब्बल ७० लाखाचे बोलार्ड रस्त्यावर गाडण्याचा निर्णय घेतला. महापालिका प्रशासनाच्या या वायफळ उधळपट्टीवर  टेंडरनामाने सनसनीत वृत्त प्रकाशित करताच महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी वृत्ताची दखल घेत निर्णय बदलला. मात्र महापालिकेतील अधिकारी निधीचा तुटवडा असल्याचे हास्यास्पद कारण पुढे करत सायकल ट्रॅक व बोलार्डचा निर्णय रद्द केल्याचे जाहिर करत आहेत.

Sambhajinagar
Sambhajinagar : संत तुकाराम नाट्यगृहाचे काम संथगतीने; कधी वाजणार घंटा?

महापालिका प्रशासनांतर्गत स्मार्ट सिटी कार्पोरेशनने यापुर्वी शहरात कोट्यावधी रूपये खर्च करून क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन, कॅनाॅट गार्डन, चिश्तीया चौक ते एमजीएमसह प्रोझोन माॅल ते कलाग्राम व  शहरातील वेगवेगळ्या भागात सायकल ट्रॅक तयार केले होते. शिवाय शहरातील वेगवेगळ्या भागातील चौकाचौकात डाव्या व उजव्या बाजुचे वळणमार्ग तयार करण्यासाठी व दुभाजकासाठी देखील  रस्त्यांवर बोलार्ड गाडले गेले होते. याकामातून केवळ पुरवठादाराची तुंबडी भरली गेली व त्याच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रशासनातील कारभार्यांचे उखळ पांढरे झाले. मात्र शहरवासीयांना याचा कुठलाही फायदा न मिळता यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला. सुरूवातीपासूनच नागरिकांचा विरोध असताना तत्कालीन महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तीककुमार पांण्डेय यांनी त्यांचे घोडे दामटवले. 

Sambhajinagar
Nashik : ग्रामपंचायायतींकडील 48 कोटींची थकबाकी ठरतेय जलजीवनची डोकेदुखी

आजघडीला शहरातील सर्वच भागातील अशा पध्दतीने बोलार्ड लावून तयार केलेले दुभाजक, सायकल ट्रॅक व वळणमार्गातील बोलार्ड उखडले गेलेले आहेत. सर्वच भागात खिळे अपघाताला आमंत्रण देत आहेत. विशेषतः वाहनांच्या धुरांनी काळवंडलेले बोलार्ड शहराची रया घालवत विद्रूपीकरण करत आहेत. हा अनुभव पाठीशी असतानाही महापालिकेतील काही कारभार्यांनी पुरवठाधारकाची मर्जी राखण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम महोत्सवासाठी ४० कोटी रूपयातून दिल्लीगेट ते हर्सुल या मार्गावर तीन कोटीचा सायकल ट्रक व झोन क्र. ४ अंतर्गत विविध चौकातील लेफ्ट टर्न फ्री करण्यासाठी तब्बल ७० लाखाचे बोलार्ड रस्त्यावर गाडण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात महापालिकेने शासनाच्या नगर विकास विभागाकडे दिलेल्या प्रस्तावासोबत दिलेल्या ३० विकास कामांची  यादी टेंडरनामाने मिळवली असता त्यात महापालिका कारभार्यांनी याकामाचा समावेश केला होता. काही दिवसांपुर्वी शहराच्या विद्रूपीकरणात भर घालणाऱ्या बोलार्डचा वापर करून या सायकल ट्रॅक, वळणमार्ग आणि दुभाजकावर टेंडरनामाने वृत्तमालिका प्रकाशित केली असता जी. श्रीकांत यांनी तातडीने स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या कारभार्यांची तातडीने बैठक घेत ते उखडून काढून त्यावर पर्याय मार्ग काढण्याचे आदेशित केले होते. असे असताना कारभाऱ्यांनी या कामाचा समावेश केला होता. 

Sambhajinagar
Mumbai : हार्बरवरील 'या' 4 रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार; 130 कोटींचे बजेट

दिल्लीगेट ते हर्सुल हा व्हीआयपी मार्ग आहे. शहरातील मुख्य वर्दळीचा मार्ग आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी व जळगाव तसेच सिल्लोड, भोकरदन व बुलढाणाकडे जाणार्या सर्व बसेससह अवजड व हलकी वाहने यामार्गाने जातात. अशातच या मार्गात सायकल ट्रॅक तयार केल्यास रस्ता अरूंद होऊन वाहतुकीला अडथळा ठरेल. पर्यायाने अपघात वाढण्याची दाट शक्यता आहे. यावर टेंडरनामाने वृत्त प्रकाशित करताच माजी नगरसेवक रूपचंद वाघमारे, मोहन मेघावाले, किशोर नागरे यांच्यासह नागरिकातून सायकल ट्रॅक व इतर कामाला विरोध करण्यात आला. याची दखल घेत प्रशासनाने दोन्ही कामे रद्द केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com