Sambhajinagar : जालना रोडवर चक्क दुभाजकातच होर्डिंग; प्रशासकांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह

Tender News : प्रशासनाच्या कडक कारवाईची अपेक्षा तरीही सुरक्षिततेच्या प्रश्नांवर मौन
Jalna Road
Jalna RoadTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : गॅस गळती प्रकरणानंतर महानगरपालिका प्रशासक आणि पोलिस आयुक्तांना 'टेंडरनामा' प्रतिनिधीने गुरूवारी रस्त्यांच्या तांत्रिक दोषांवर थेट सवाल केला. त्यावर प्रशासक जी. श्रीकांत यांनी अशी घटना शहरात घडू नये यासाठी दुभाजकात होर्डिंग उभारणीवर टाच आणण्याची घोषणा करणार असल्याचे स्पष्ट केले.

मुंबईच्या प्रो ॲक्टिव्ह कंपनीच्या कंत्राटदारांची कान उघाडणी केली. मात्र त्याला कार्यारंभ आदेश देणाऱ्या स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांबाबत जी. श्रीकांत यांनी मौन पाळले. त्यामुळे प्रशासकांच्या कारवाईवरच प्रश्न चिन्ह उभे रहात आहे. 

Jalna Road
Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वेसाठी Good News! अर्थसंकल्पात तब्बल 2424 कोटींचा...

गुरुवारी सिडको उड्डाणपुलाच्या चढावरील कठड्याला धडक दिल्याने १८ ते २० टनाने भरलेला एलपीजी गॅसचा १२ टायरचा ट्रक पलटी झाला आणि गॅस गळती सुरू झाली. दरम्यान टेंडरनामा प्रतिनिधीने ज्या ठिकाणी ट्रक पलटी झाला त्याच्या बाजुलाच एका कंत्राटदाराने दुभाजकात होर्डिंगसाठी खड्डा खोदून त्याची माती रस्त्यावर पसरलेली होती. रस्त्याच्या या तांत्रिक दोषाकडे बोट दाखवत प्रतिनिधीने प्रसार माध्यमातील प्रतिनिधींसमोरच पोलिस आयुक्त व महानगरपालिका प्रशासकांपुढे याच तांत्रिक दोषांमुळेच गुरुवारी गॅस गळती झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा पोलिस आयुक्त व महानगरपालिका प्रशासकांचा भडका उडाला.

भविष्यात शहरातील प्रमुख रस्त्यांवर अशी घटना घडू नये म्हणून काही उपाययोजना करणार काय? आग लागल्यावरच पाण्याचा मारा करणार काय, असे अनेक मुद्दे उपस्थित केल्यानंतर प्रशासक जी. श्रीकांत यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तज्ज्ञांनी समितीही स्थापन केली.

जालना रस्त्याला पर्यायी झेंडा चौक, कैलासनगर, जिन्सी, पीईएस काॅलेजचे रस्ते मोकळे करण्याचा निर्णय घेतला. अग्निशमनला साधनांची गरज असल्याची बुध्दीही त्यांना सुचली. अशी अप्रिय घटना घडल्यानंतर शहरात जागोजागी टॅंकर भरता यावेत यासाठी त्यांनी तशी सोय उपलब्ध करण्याचा चांगला निर्णय घेतला. शहरात बहुमजली इमारती होत असल्याने गॅस गळतीची घटना घडल्यानंतर त्यांनी संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून शासनाकडे लॅडर्सआठी (अत्याधुनिक उंच शिडी असलेले वाहन) खरेदीसाठी २५ कोटीचा निधी उपलब्धतेसाठी महानगरपालिकेच्या वतीने जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने प्रस्ताव पाठविला.

तसेच भूकंपाचा अलर्ट मिळण्यासाठी जायकवाडी धरणावर भूकंपमापक केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही. त्यासाठी संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान औद्योगिक सुरक्षेसाठी उद्योग सहसंचालक यांच्याकडे यंत्रणा असल्याचे जिल्हा आपत्ती विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

Jalna Road
नाशिक होणार वेअरहाउस हब; महिंद्रा लॉजिस्टिकची 500 कोटींची गुंतवणूक

दरम्यान, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्यावतीने मुंबईच्या प्रो ॲक्टिव्ह कंपनीला शहरातील दुभाजकात होर्डिंग लावण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. कंपनीने ज्या ठिकाणी ट्रक पलटी झाला त्याच्या शेजारीच चार दिवसांपासून दुभाजकात पाच फुटाचा खड्डा उकरलेला होता. उकरलेली माती रस्त्याच्या दोन्ही बाजूला तशीच टाकून कंत्राटदाराची यंत्रणा पसार झाली होती.

सिडको उड्डाणपुलाच्या अलिकडेच जालना रोडवर दुभाजकात होर्डिंग उभारण्यासाठी कंत्राटदाराने उकरलेला खड्डा व या खड्ड्याच्या बाजुला अस्ताव्यस्त रस्त्यावर पसरलेला मातीचा ढिगारा वाचविण्यासाठी गॅस टँकर चालक डाव्या बाजूने जात असताना अपघात झाला. हा मुद्दा उपस्थित करत टेंडरनामा प्रतिनिधीने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच कंत्राटदाराच्या हलगर्जीपणावर प्रशासकांपुढे मुद्दे उपस्थित केले व प्रशासकांना ढिगारा दाखवला.

त्यानंतर या गंभीर घटनेला जबाबदार असलेल्या प्रो ॲक्टिव्ह कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून प्रशासक जी. श्रीकांत यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. दरम्यान कंपनीला तूर्त रस्त्यावर पसरलेले मातीचे ढिगारे उचला, खड्ड्याच्या दोन्ही बाजूने सावधानतेचा इशारा देणारे फलक लावा व काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले. वाहतूक पोलिस, महानगपालिकेच्या एनओसीशिवाय होर्डिंग उभारता येणार नाही, अशी तंबीही दिली.

शहरातील स्मार्ट बससेवेसाठी शहरात १५० बसथांबे उभारण्याचे काम मुंबईच्या प्रो ॲक्टिव्ह कंपनीला २०१७ मध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनमार्फत  कंत्राट दिले आहे. कंपनीने स्वत:च्या पैशातून बसथांबे उभारावेत, त्यावर छोटे-छोटे होर्डिंग उभारून महसूल गोळा करावा, असे ठरले. नंतर कंपनीने स्मार्ट सिटीतील कारभाऱ्यांना हाताशी धरून बसथांब्याच्या बाजूला मोठे होर्डिंग उभारण्याचा निर्णय घेतला. कंपनी एवढ्यावरच थांबली नाही, तर दुभाजकात मोठ-मोठे होर्डींग उभारणीचे पत्रही स्मार्ट सिटीकडून घेतले. हे पत्र मिळताच पाच महिन्यांपासून शहरात १५० ठिकाणी होर्डिंग उभारणीला सुरवात केली.

Jalna Road
PCMC : पिंपरी चिंचवडमध्ये का झालाय अनधिकृत किऑस्कचा सुळसुळाट?

होर्डिंग उभारणीचे नियम पायदळी तुडवत काम सुरू केले. त्यातील एक होर्डिंग सिडको उड्डाणपुलाच्या अलीकडे उभारले जात होते. त्यासाठी खड्डा केला, माती रस्त्यावर सोडून कंपनी निघून गेली. या मातीजवळ रिफ्लेक्टर रिबीन, बॅरिकेट्स उभारले नव्हते. त्यामुळे गॅस टँकर चालक डाव्या बाजूने जाताना अपघात झाला.

दरम्यान टेंडरनामा प्रतिनिधीने रस्त्यांच्या अनेक तांत्रिक उणिवांवर बोट दाखवताच शुक्रवारी सकाळीच प्रो ॲक्टिव्हच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जी. श्रीकांत यांनी बोलावून घेतले. त्यांची चांगलीच कान उघाडणी केली. संबधित कंत्राटदाराच्या कामाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. यापुढे महानगरपालिका मालमत्ता व शहर वाहतूक शाखा यांच्या ना- हरकत नंतरच होर्डींग लावण्याचा निर्णय घेतला.

स्मार्ट सिटीने प्रो ॲक्टिव्ह कंपनीला काम देताना बसथांब्यावर प्रवाशांना विविध सुविधा असाव्यात, असे करारात म्हटले आहेत. बस थांब्यावर पिण्याच्या पाण्याचीही सोय असावी, असे म्हटले आहे. आजपर्यंत ते काम न करता कंपनी निव्वळ कोट्यवधी रुपये कमविण्याच्या मागे लागली आहे. आता या सर्व प्रकारच्या अनागोंदीची चौकशी केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com