Sambhajinagar : कोट्यवधींचा खर्च पाण्यात; फुटपाथवर वाहनांचा ताफा, शहरभर वाहतूक कोंडी

Sambhajinagar : कोट्यवधींचा खर्च पाण्यात; फुटपाथवर वाहनांचा ताफा, शहरभर वाहतूक कोंडी

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत. त्यात शहरभर नवीन पाणी पुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी सिमेंटचे नवेकोरे रस्ते खोदले जात आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी ऐकेरी वाहतूक सुरू आहे.

दुसरीकडे एकाच वेळी महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून रस्त्यांची कामे सुरू आहेत. यातील बहुतांश रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आली आहेत. या परिस्थितीत महानगरपालिकेने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला केबल टाकण्यासाठी ६५ किलोमीटर अंतरात परवानगी दिली आहे. या सर्व कामांमुळे शहरातील वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. 

Sambhajinagar : कोट्यवधींचा खर्च पाण्यात; फुटपाथवर वाहनांचा ताफा, शहरभर वाहतूक कोंडी
Konkan Expressway : मुंबई-गोवा हायवे आता विसरा; MSRDC देणार सुसाट प्रवासाचे 2 नवे पर्याय

शहरात सर्वत्र वाहतुकीची कोंडी असताना मात्र जिथे कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंटचे रस्ते, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना फुटपाथ करण्यात आले आहेत, त्यावर वाहनांची बेकायदा पार्किंग झाले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांनी पाय ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. धक्कादायक म्हणजे शहरातील काही मुख्य रस्त्यांवर दुभाजकाच्या मधोमध वाहनांची बेकायदा पार्किंग झाली आहे. एकीकडे फुटपाथ आणि दुसरीकडं रस्त्यांच्या मधोमध अशा बेकायदा पार्किंगमुळे छत्रपती संभाजीनगरकरांना पुरेसे रस्ते आणि फुटपाथचा वापर करता येत नाही.‌ परिणामी शहरात वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. 

शहरातील चिश्तिया कॉलनी ते सेंट्रल नाकामार्गे, प्रोझोन माॅल ते भारत बाजार, सुतगिरणी चौक ते एकता चौक, सिडको बसस्थानक परिसरातील सर्व्हिस रोड, चिश्तिया चौक ते बळीराम पाटील शाळा, जालनारोड, बीड बायपास, क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशनरोड, क्रांतीचौक ते पैठणरोड जुन्या शहरातील औरंगपुरा, टिळकपथ व अग्रसेन चौक ते जीएसटी कार्यालय, चिश्तिया चौक ते एसबईआय ते जळगाव टी पाॅईंट या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत, त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत.

Sambhajinagar : कोट्यवधींचा खर्च पाण्यात; फुटपाथवर वाहनांचा ताफा, शहरभर वाहतूक कोंडी
Nashik ZP : डीपीसीने नाक दाबताच झेडपीचे उघडले तोंड; अखर्चित 7 कोटी सरकारकडे जमा

हे रस्ते आणि फुटपाथ मोकळे करावेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी.श्रीकांत यांच्याकडे केली आहे.

चिश्तिया कॉलनी-सेंट्रल नाका रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने उभी असतात. वाहनांसाठी एमजीएम विद्यापीठ, चिश्तिया कॉलनीसमोरील रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी, दुचाकी वाहनांची पार्किंग करण्यात येते. रुग्णालयात, शिक्षण संस्थेत येणारे वाहनचालक आतील पार्किंगमध्ये न लावता सर्रास रस्त्यावरच वाहने लावतात. एमजीएम प्रशासनाने मुख्य रस्त्यावर बॅरिकेड्स लावले आहेत, त्याबाहेर ही वाहने उभी केली जातात. त्यामुळे अर्धा रस्ता पार्किंगमध्येच जातो. याशिवाय चिश्तिया कॉलनी रोड ते सेंट्रल नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावरही एका बाजूने चारचाकी वाहनांची लांब रांग असते. यामुळेही वाहनधारकांची मोठी अडचण होते. 

Sambhajinagar : कोट्यवधींचा खर्च पाण्यात; फुटपाथवर वाहनांचा ताफा, शहरभर वाहतूक कोंडी
Nashik : आडगावच्या ट्रक टर्मिनलमधील इलेक्ट्रिक बसडेपोला विरोध

वाहतूक पोलिस व महानगरपालिकेच्या पथकाने हे बेकायदा पार्किंग बंद करून वाहतुकीस रस्ता मोकळा करावा, असा आरोप  नरवडे यांनी केला आहे. किराडपुऱ्यासह अनेक रस्त्यांवर हीच समस्या गणेश कॉलनी, रोशनगेट, जाफरगेट भागात नव्यानेच रस्ता तयार करण्यात आला. या ठिकाणी रस्त्याच्या शेजारी जड वाहने सर्रास उभी केली जातात.

याशिवाय रोशनगेट, किराडपुरा, कटकटगेट, बायजीपुरा हा शहरातील दाट वस्ती तसेच व्यस्त वाहतुकीचा भाग, या ठिकाणीही रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्यात येतात. जकात नाका ते हडको या रस्त्यावर गॅरेज तसेच जुने फर्निचर विक्री करण्याची दुकाने आहेत. त्यांची वाहनेही रस्त्यांवरच पार्क होतात, यावर कारवाई करावी असे नरवडे यांचे म्हणणे  आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com