Sambhajinagar: प्रशासक साहेब, आणखी किती पाईप जाळणार? किती जणांचे बळी घेणार?

Chhatrapati Sambhajinagar : शहरातील जीव्हीपीआरच्या पाईपलाइनचे धोकादायक ढिग उठले नागरिकांच्या जीवावर
Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरात रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली पाईपच्या ढिगाऱ्याला आग लागली आणि शेकडो पाईप जळून खाक झाले. आगीत जळालेल्या पाईपचा अग्निशमन विभागाने अहवाल सादर केला असता पाईप ढिगाऱ्यावर कचराकोंडी झाल्याने त्याला कोणीतरी अज्ञात इसमाने आग लावली आणि पाईपांची राख झाली. खरे तर, ही चूक महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील कामचुकार अधिकाऱ्यांची आहे. त्यात टेंडरनामा प्रतिनिधीने ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर या पाईपांची शहरभर फिरून पाहणी केली असता, आणखी किती पाईप जाळणार अशीच स्थिती शहरभर आहे.

Sambhajinagar
Nagpur : नवीन नागपूरचा जानेवारीत फुटणार नारळ? 750 कोटींच्या कामांचा 'असा' आहे प्लॅन

यात कंपनीचे मोठे नुकसान होईल, मात्र जळालेल्या पाईपांची नुकसान भरपाई नळपट्टी भरणाऱ्या नागरिकांकडूनच अतिरिक्त भूर्दंड म्हणून वसुल केली जाईल, असा निष्कर्ष लावत शहरभर कंपनी व महानगरपालिकेच्या बेफिकिरी कारभारावर छत्रपती संभाजीनगरकर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

याशिवाय जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराने शहरभर मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर तसेच फुटपाथवर अपघाताला अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी पाईप ठेवल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. झालेही तसेच, कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आजवर काम सुरू झाल्यापासून चार व्यक्तींचा हकनाक बळी गेला आहे. त्यामुळे कंपनी, महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी किती बळी घेणार आहात, असा रोखठोक सवाल स्वतः टेंडरनामाच्या पाहणीत उपस्थित होत आहे.

Sambhajinagar
Nagpur Metro: नागपुरात मेट्रोची धाव आता 83 किलोमीटर पर्यंत! 6 हजार 708 कोटींची तरतूद

यापूर्वी अशाच प्रकारे महावितरण कंपनीच्या रोहीत्रे, विद्युत केबलवर कचऱ्याचे ढीग साचल्याने शहरात अनेक भागात रोहीत्रे जळाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. या सर्व घटना ताज्या असताना टक्केवारीच्या धुंदीत असलेल्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनावर कुणाचाही वचक नसल्याचे दिसत आहे. मुळात प्रतिनिधीने जीव्हीपीआर कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा करारनामा आणि टेंडरमधील अटी शर्ती तपासल्या असता महानगरपालिकेने रस्त्यात, फुटपाथवर तसेच खुल्या पटांगणात जिथे अपघाताची शक्यता बळावत असेल, नागरिकांकडून तक्रारींचा ओघ होईल, अशा ठिकाणी पाईप ठेवण्यास मनाई केली आहे. मात्र वर्ष - सहामहिने कंत्राटदार कंपनीला सार्वजनिक रस्ते, फुटपाथवर पाईपच्या गोदामाला परवाना नसताना कंत्राटदार कंपनी प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत आहे.

दुसरीकडे त्या पाईपच्या ढिगाऱ्यावर झालेली कचराकोंडी उचलण्याकडे महानगरपालिकेतील घनकचरा विभागाचे सहाय्यक आयुक्त व घनकचरा विभागप्रमुख सोमनाथ जाधव यांचा स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी, जवान व प्रभाग अधिकाऱ्यांवर कसलाही दबाव नाही. याउलट पाईपच्या ढिगाऱ्यावरील कचरा जाळताना त्या ठिकाणी ज्वलनशील वस्तूंच्या सहाय्याने आग लावली जाते,  सुरक्षेची काळजी घेतली जात नाही, कंत्राटदार कंपनीकडून पाइप ठेवण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नाहीत.

यामागे जनतेच्या पैशाचा चुराडा करून कंपनीला अधिकाधिक पाइपांची खरेदी करायची का? यात नगाची संख्या वाढली तर कंपनीशी काही टक्केवारी आहे काय, असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. प्रशासक जी. श्रीकांत यांनी याची उत्तरे संबंधितांकडून शोधायला हवीत. कठोर निर्णय घेण्याची नितांत गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com