अखेर शेंद्रा MIDCतील 'त्या' रस्त्याची मलमपट्टी; इतर सुविधांचे काय?

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : ऑरिक सिटीच्या २५ एकर जागेवर होत असलेल्या ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपोच्या निमित्ताने जालनारोड ते शेंद्रा एमआयडीसीतून परकींन्स ते ऑरिक सिटीकडे जाणाऱ्या एका रस्त्याच्या तात्पुरत्या मलमपट्टीचे शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे उद्योजक आणि कामगार वर्गातून समाधानाचे वातावरण पसरले आहे. असे असले तरी गेल्या १६ वर्षांपासून इतर रस्त्यांची कामे न झाल्याने तसेच मर्क्युरी दिव्यांची देखभाल दुरूस्ती, दुभाजकातील सुशोभिकरणात वाढलेली रानटी झुडपे तसेच गवतामुळे होत असलेल्या विद्रुपीकरणाकडे देखील एमआयडीसी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी उद्योजकांकडुन पुढे आली आहे.  शिवाय या भागात कोट्यावधीची जलवाहिनी टाकण्याचा गवगवा केला जात असताना चक्क दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप केला जात आहे.

Aurangabad
'टेंडरनामा'ने उघड केलेल्या MIDC भूखंड घोटाळ्यावर शिक्कामोर्तब?

एमआयडीसीच्या स्थापत्य विभागाच्या जालनारोड ते अजिंठा फार्मा या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी जुन २०२२ मध्ये दोन कोटीचे टेंडर काढण्यात आले होते. तीस टक्के कमी दराने टेंडर भरणाऱ्या औरंगाबादच्या मस्कट कन्सट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते. मात्र पावसाळा संपल्यानंतर तीन महिन्यात देखील काम सुरू करण्यात आले नव्हते. 'टेंडरनामा'ने प्रहार करताच तीन दिवसापूर्वी काम सुरू करण्यात आले आहे. जालनारोडच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अजिंठा फार्मास्युटीकल कंपनीपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. 'टेंडरनामा'च्या वृत्ताची दखल घेत ५ ते ८ जानेवारी दरम्यान ऑरिक सिटी येथे होणाऱ्या ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपो निमित्ताने ऑरिक सिटी ते परकिंन्स कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याचे देखील भाग्य उजळत आहे. या रस्त्याचे देखील डांबरीकरण करण्यात येत आहे. 

Aurangabad
औरंगाबाद : 'त्या' पुलाचे सदोष डिझाइन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

दरम्यान, असे असले तरी कोट्यावधींचा महसुल उकळणाऱ्या एमआयडीसी, डीएम आयसी आणि ऑरिक सिटी प्रशासनाने इकडे जशी तत्परता दाखवली तशीच तत्परता इतर रस्त्यांवर देखील दाखवावी अशी मागणी उद्योजक करत आहेत. गेल्या सोळा वर्षांपासून रस्त्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष नाही, मग उद्योजकांकडुन उकळलेला महसूल कुठे जातो, असा सवाल टेंडरनामाच्या पाहणीत समोर आला आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या कामगार, उद्योजकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. इतर रखडलेल्या रस्त्यांचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, यासाठी उद्योजक सातत्याने पाठपुरावा करत आहेत. 

पथदिव्यांकडे कधी लक्ष घालणार?

'टेंडरनामा' प्रतिनिधीने ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्पोनिमित्ताने शेंद्रा पंचतारांकीत एमआयडीसी, डीएमआयसी आणि ऑरिक सिटीची सलग तीन दिवस पाहणी केली. येथील औद्योगिक वसाहती स्थापन करताना प्रत्येक रस्त्याच्या कडेला पथदिवे लावण्यात आले. मात्र गेल्या काही वर्षात पथदिव्यांची देखभाल दुरूस्तीकडे कानाडोळा केल्याने दिव्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, अनेक खांब दिव्यांअभावी उभे आहेत, काहींच्या साॅकेटमधून दिवेच गायब झाले आहेत, अनेक खांब वाकडे झाले आहेत. अनेक दिवे बंद असल्याने 'खाली खड्डे वर अंधार' अशा द्विधा स्थितीतून उद्योजक कामगारांना वाट काढावी लागत आहे. सर्वच मार्गावर अंधाराचे साम्राज्य आहे. अपघाताचे प्रमाण वाढल्याने कामगार व उद्योजक वर्गात असंतोष आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील कामगारांची व उद्योजकांची २४ या रस्त्यावर वर्दळ असते.  गैरसोय टाळण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून दुभाजकांवर, रस्त्याच्या कडेले मर्क्युरी दिवे लावण्यात आले. मात्र आज त्यांचा पुरेसा फायदा मिळत नसल्याची शोकांतिका व्यक्त केली जात आहे.

Aurangabad
2 हजार ST बस खरेदीसाठी टेंडर तर १७० नवीन चार्जिंग स्टेशन्स...

वृध्दीसाठी उद्योजकांची धडपड

कोट्यावधींचा महसुल जमा करून उद्योजकांना विकासाच्या अंधारात लोटणाऱ्या एमआयडीसी, डीएमआयसी आणि ऑरिक सिटीतील दुर्लक्षित कारभाऱ्यांचा येथील उद्योजकांना चांगलाच फटका बसला आहे. असे असताना येथील उद्योजक सतत विदेशी गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करत असतात येत्या तीन दिवसात तब्बल २५ एकर प्रांगणात ५ ते ८ जानेवारीदरम्यान ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचे आयोजन केले जात आहे. यात जगभरातून दाखल होणाऱ्या उद्योजकांसह देशातील तब्बल ६०० स्टॉल येथे उभारण्यात येत आहेत. यासाठी ३ बाय ३ ते १५ बाय ६ फुटांचे स्टॉल तयार केले आहेत. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर (मसिआ) संघटनेतर्फे आयोजित हे आठवे एक्स्पो आहे. एक्स्पोचे ऑनलाईन  उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेच मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शेंद्रा एमआयडीसी येथील ऑरिक सिटीमध्ये १४ एकर जागेत दोन वेगवेगळे सेक्टर केले आहेत. त्यामध्ये फूड, ॲग्री, इलेक्ट्रिकल स्टॉल, तर दुसऱ्या विभागात मशिनरी, टूल्स आणि ट्रेडिंग स्टॉल्स असणार आहेत. यासाठी मसिआचे  शंभरहुन अधिक पदाधिकारी गत तीन महिन्यांपासून  परिश्रम घेत आहेत. प्रदर्शन स्थळावरील भव्यता बघून एखादे शहरच वसल्याची अनुभूती येत आहे. मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, राहुल मोगले, अब्दुल शेख, अभय हंचनाळ, भरत मोतिंगे, सुनील किर्दक, अर्जुन गायकवाड, गजानन देशमुख, विकास पाटील, दुष्यंत आठवले, भगवान राउत आदी पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com