नांदेड जिल्ह्यासाठी राज्य सरकारने काय दिली गुड न्यूज?

नांदेडमध्ये ५०० खाटांचे रुग्णालय उभारणार; सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
Prakash Abitkar
Prakash AbitkarTendernama
Published on

मुंबई (Mumbai): नांदेड जिल्हा रुग्णालयाचे ५०० खाटांपर्यंत श्रेणीवर्धन करून ते उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

Prakash Abitkar
Prakash Abitkar: आरोग्य विभागातील अनियमिततेबाबत सरकार कठोर; दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई

राज्यात शासकीय रुग्णालयांची सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असून, विविध आरोग्य योजनांद्वारे नागरिकांना परवडणाऱ्या व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, नांदेड जिल्हा रुग्णालयाचे यापूर्वी १०० खाटांवरून ३०० खाटांपर्यंत श्रेणीवर्धन करण्यात आले होते आणि त्यासाठी १३८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर ३०० वरून ५०० खाटांसाठी श्रेणीवर्धनासही मान्यता मिळाली. तथापि, प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. राज्यातील अपूर्ण कामांचा आढावा घेतल्यानंतर ज्या प्रकल्पांची कामे प्रत्यक्ष सुरू झाली नव्हती, अशा सुमारे १७०७ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आल्या असून त्यामध्ये नांदेड रुग्णालयाचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

Prakash Abitkar
Dharashiv District Hospital: धाराशिवसाठी महत्त्वाची बातमी; 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाबाबत काय दिले निर्देश?

नांदेड शहराची वाढती लोकसंख्या आणि रुग्णसंख्या लक्षात घेता नव्या आर्थिक प्रस्तावातून या रुग्णालयासाठी निधी व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासन सकारात्मक असून, लवकरच कामाला सुरुवात करण्यात येईल. लोकप्रतिनिधींच्या मागण्या, स्थानिक गरजा आणि उपलब्ध निधी यांचा समन्वय साधून आरोग्य सुविधा टप्प्याटप्प्याने उभारण्यात येणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांमधील दर नियंत्रणाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना याबाबत स्वतंत्र कायदा नसला तरी विद्यमान कायद्यानुसार रुग्णालयांना त्यांच्या सेवांचे दर फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा देण्यात आल्या असून काहींची परवानगीही रद्द करण्यात आली असल्याची माहिती आबिटकर यांनी दिली.

सदस्य श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेत यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य तुषार राठोड, राजेश पवार, चंद्रदीप नरके यांनी सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com