काळाबाजार उघड होताच अधिकाऱ्यांकडून बिल्डिंग मटेरियलची लपवाछपवी 

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : टेंडरनामाने १९ डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी व सहाय्यक अभियंता प्रशांत सरग तसेच फिडर व्ही. एम. बनसोडे यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी कार्यकारी अभियंता भागवतराव फड यांच्यामार्फत चौकशी सुरू केली आहे. चौकशीत आपला काळाबाजार उघड होऊ नये यासाठी त्याच दिवशी काही तासात रस्ता बांधकामावरून एका ट्रॅक्टरद्वारे बिल्डिंग मटेरियल लांबविण्याचा केविलवाणा प्रकार या अधिकाऱ्यांनी केल्याचे टेंडरनामा तपासात उघड झाले आहे.

Aurangabad
कंत्राटफेम आमदाराचे 'लाड' पुरवतेय कोण?750कोटीच्या टेंडरचा 'प्रसाद'

शहर अभियंत्यांच्या कारवाईकडे लक्ष

टेंडरनामाचे वृत्त आणि शहर अभियंता पानझडे यांनी कार्यकारी अभियंत्यांमार्फत तडकाफडकी सुरू केलेली चौकशी यामुळे औरंगाबादेतील संग्रामनगर उड्डाणपूल येथे जलवाहिनीसाठी उकरलेल्या खड्ड्यात चक्क बिल्डिंग मटेरियल टाकून खड्डे बुजवण्याचा या भ्रष्ट कारभाऱ्यांचा प्रयत्न फसला असून, निकृष्ट दर्जाच्या बिल्डिंग मटेरियलचा वापर करून खड्डा बुजविण्यासंदर्भात शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी नोटीस बजावली. मातीमिश्रित बिल्डिंग मटेरियल टाकून खड्डा न बुजवण्याची तंबी त्यांनी दिली आहे. मात्र आता कार्यकारी अभियंत्यांनी सादर केलेल्या अहवालानंतर ते मनपाची फसवणूक करणाऱ्या एमआयडीडीच्या अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई करतात, याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागून आहे.

प्रशांत सरग यांची चौकशी व्हावी

एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता प्रशांत सरग यांच्याकडे गेल्या साडेतीन वर्षांपासून वाळूज ते चिकलठाणा एमआरडीसीत पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीचा पदभार दिला आहे. गेल्या चाळीसी उलटलेल्या या जलवाहिनीची पाणी वाहून नेण्याची क्षमता संपलेली आहे. जिर्णशीर्ण झालेल्या जलवाहिनीतून पाण्याचा दाब वाढताच जलवाहिनी फुटून पाण्याच्या नासाडीसह रस्त्यातील खड्डे उघडे पडतात. दरम्यान, आजवर जलवाहिनीसह रस्ता दुरूस्तीसाठी केलेल्या खर्चाचा ताळमेळ लावण्यासाठी सरग यांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे समोर येत आहे. 

Aurangabad
EXCLUSIVE: सरकारमधील 25 आमदारांना हवेत 1200 कोटींचे टेंडर

दुरूस्तीसाठी कोट्यावधींचा खर्च

जलवाहिनी दुरूस्तीसाठी मागील दहावर्षात आत्तापर्यंत कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आलेले आहेत. सालाबादप्रमाणे जलवाहिनी दुरूस्तीसाठी सोळा ते सतरा लाखाचे टेंडर काढले जाते. दुरूस्तीसाठी वाहतूक शाखेसह संबधित रस्ता प्राधिकरणाची परवानगी घेतली जाते. मात्र जलवाहिनीची दुरूस्ती झाल्यानंतर कार्यरत ठेकेदाराकडून टेंडरच्या अटीशर्तीनुसार रस्ता दुरूस्तीची कामे उपलब्ध रकमेमध्ये कुठल्याही मानकानुसार न करता सदर रकमेचा अपहार केला जात असल्याचा संग्रामनगर उड्डाणपुलाच्या कामावरून काळाबाजार टेंडरनामाने उघड केला.

खड्ड्यात चक्क बिल्डिंग मटेरियल

सदर कामात मुरूम आणि खडीचा वापर न करता चक्क बिल्डिंग मटेरियलचा वापर करण्यात आला. यावरून निकृष्ट साहित्याचा वापर करून चांगल्या साहित्याची देयके लाटण्यात आल्याचा संशय बळावत आहे. शहानुरवाडी एकता चौक ते संग्रामनगर उड्डाणपुलाच्या उतारावर जलवाहिनी दुरूस्त केल्यानंतर अधिकाऱ्यांनी रस्ता दुरूस्तीच्या नावाखाली खड्ड्यांमध्ये जुनाट बिल्डिंग मटेरियल, मुरूमाऐवजी माती अशा निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले.

Aurangabad
मुंबईतील मॅनहोलच्या दुरुस्तीसाठी ३० कोटींचे टेंडर

अधिकाऱ्यांची अशी ही लपवाछपवी

याबाबतचे वृत्त टेंडरनामात प्रकाशित झाल्यानंतर मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी कार्यकारी अभियंता भागवतराव फड यांना चौकशीचे आदेश दिले. फड यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर चौकशी अहवाल शहर अभियंत्यांकडे पोहोचण्याआधीच एमआयडीसीच्या भ्रष्ट कारभाऱ्यांनी केलेला काळाबाजार लपवण्यासाठी निकृष्ट बांधकाम साहित्य लपविण्यासाठी त्याच दिवशी दुपारच्या वेळेस ट्रॅक्टरद्वारे रस्त्यावरून उचलून इतरत्र ठिकाणी लांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहनधारकांनी या निकृष्ट साहित्याचा वापर करून रस्ता दुरूस्तीच्या कामाची चौकशी झाल्याशिवाय पुढील दुरूस्तीचे काम करू न देण्याची आक्रमक भूमिका घेतल्याने निकृष्ट बांधकाम लपविण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न फसला आहे. आता शहर अभियंता सखाराम पानझडे नेमकी काय कारवाई करतात याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com