
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : म्हाडाने मराठवाड्यातील तब्बल सहा जिल्ह्यांत चार विविध योजनांतर्गत १४९४ सदनिकांची फेब्रुवारी २०२४ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याच्या तब्बल पाच महिन्यांनंतर अखेर म्हाडाला संगणकीय पध्दतीने सोडत काढायला मुहूर्त मिळाला. मंगळवारी १६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका सभागृहात गृहनिर्माण मंत्र्यांच्या हस्ते सदनिकांची सोडत काढण्यात आली.
म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ४२५, म्हाडा गृहनिर्माण योजनांतर्गत ५९४, सर्व उत्पन्न गट योजनेंतर्गत ४२, म्हाडा गृहनिर्माण व २० टक्के सर्व समावेशक योजनेंतर्गत ४३३ अशा एकुण १४९४ सदनिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात जाहिरात प्रसिद्ध केली होती. यात म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत ३०९ व २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत ५२ अशा ३६१ निवासी भुखंडांचा समावेश आहे तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत २१९ व २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत २२ अशा २४१ निवासी बैठे गाळ्यांचा समावेश आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ४२५, म्हाडा गृहनिर्माण योजनांतर्गत १३१ , सर्व उत्पन्न गट योजनेंतर्गत ३३६ अशा एकुण ९१४ निवासी सदनिकांचा समावेश असून एकुण १४९४ सदनिकांचा समावेश आहे. या सोडतीतील सदनिका अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत. तसेच भूखंड सर्व उत्पन्न गटातील अर्जदारांकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. दरम्यान मंडळाने काही कारणाने या सोडतीच्या सोडतपूर्व प्रक्रियेला २६ मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र त्यानंतर सोडतीला काही मुहुर्त लागत नव्हता. त्यामुळे पात्र अर्जदारांची हक्काच्या घराची प्रतीक्षा लांबली होती.
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत १०५२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९८३ इच्छुकांनी अनामत रक्कम भरली होती. यापैकी ९५७ अर्ज स्विकारण्यात आले होते व ३६ अर्ज नाकारण्यात आले होते. या योजनेतून म्हाडाला ५६ लाख १० हजार ९६४ हजाराचा महसुल मिळाला. म्हाडा गृहनिर्माण योजनांतर्गत ७४३'अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ६२९ इच्छुकांनी अनामत रक्कम भरली होती. यापैकी ६१२ अर्ज स्विकारण्यात आले व १७ अर्ज नाकारण्यात आले. यातून म्हाडाला ६६ लाख १५ हजार ३३२ रुपयांचा महसुल मिळाला. सर्व उत्पन्न गट योजनेंतर्गत २७५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २१० इच्छुकांनी अनामत रक्कम भरली होती. यापैकी २०९ अर्ज स्विकारण्यात आले व १ अर्ज नाकारण्यात आला. यातून म्हाडाला २२ लाख ४८ हजार ६८० रूपयाचा महसूल मिळाला. म्हाडा गृहनिर्माण व २० टक्के सर्व समावेशक योजनेंतर्गत २६८४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २१६७ इच्छुकांनी अनामत रक्कम भरली होती. यापैकी २०९५ अर्ज स्विकारण्यात आले व ७२ अर्ज नाकारण्यात आले. यातून म्हाडाला ४ कोटी ४७ लाख ०९ हजार २३६रूपयाचा महसूल मिळाला.अर्थात एकुण म्हाडा गृहनिर्माण व २० टक्के सर्व समावेशक योजनेंतर्गत २६८४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २१६७ इच्छुकांनी अनामत रक्कम भरली होती. यापैकी २०९५ अर्ज स्विकारण्यात आले व ७२ अर्ज नाकारण्यात आले. यातून म्हाडाला ४ कोटी ४७ लाख ०९ हजार २३६ रूपयाचा महसूल मिळाला अर्थात एकुण १४९४ सदनिकांसाठी ४७५४ इच्छुकांचे अर्ज भरले होते. भरली होती. त्यापैकी ३९८९ इच्छुकांनी अनामत रक्कम भरली होती. यापैकी ३८७३ इच्छुकांचे अर्ज स्विकारण्यात आले व ११६ अर्ज नाकारण्यात आले. यातून म्हाडाला ५ कोटी ९१ लाख ८४ हजार २१२ रूपयाचा एकुण महसूल मिळाला.या योजनेत जालना जिल्ह्यातील भोकरदन,अंबड,मंठा- टोकवाडी, जालना,नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, मुदखेड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, हिंगोली जिल्हा,परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, धाराशीव जिल्ह्यातील नळदुर्ग आदी शहरांचा समावेश करण्यात आला आहे.