Sambhajinagar: IIT कौशल्य प्रशिक्षण केंद्राची उद्योजकांची मागणी

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील ५२ एकर विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या आयटी पार्क परिसरात मराठवाड्यातील आयटी क्षेत्रात उज्वल भविष्य निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करावी, यासाठी देशातील टीसीएस सारख्या किंवा इतर प्रतिष्ठित कंपन्यांशी सामंजस्य करार करून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन केल्यास येथील विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना त्यातून लाभ घेता येईल व पुढे रोजगाराच्या संधी प्राप्त होतील.

Sambhajinagar
CM in Action:नवीन रस्त्यातील खड्ड्याला लाखाचा दंड;नालेसफाईची पाहणी

एमजीएम विद्यापीठ, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्याकडे अथवा राज्य सरकारकडे  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रस्ताव दाखल करावा, असेही उद्योजकांचे मत आहे. एमआयडीसीने अशा प्रशिक्षण केंद्रासाठी साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी पार्कमध्येच जागेची उपलब्धता व त्यासंबंधी पायाभुत सुविधा उपलंब्ध करून द्यावी असे उद्योजकांचे म्हणणे आहे.चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात यासाठी किमान दहा एकर जागा आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ५० कोटी रूपयाची आवश्यकता असेल, असा अंदाज देखील उद्योजकांनी लावला.

Sambhajinagar
Mumbai : वर्क ऑर्डर निघाली पण 'यामुळे' लांबणार पंपिंग स्टेशनचे काम

आयटी क्षेत्रात अग्रगण्य कंपन्यांशी सामंजस्य करार करून मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी सरकारने स्वतःच पुढाकार घेउन कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू केल्यास छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील युवक व युवतींना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. एमआयडीसीने त्यासाठी स्वतंत्र इमारत, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अंदाजपत्रक तयार करून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा. आयटी क्षेत्रातील संबंधित प्रतिष्ठित कंपनीसोबत सामंजस्य करार करून स्थापन केलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राद्वारे प्रशिक्षणार्थी लाभार्थी युवक - युवतींकडून मोट्या प्रमाणात साॅफ्टवेअर आणि काॅम्प्युटर इन्सटाॅल करता येतील. येथील मनुष्यबळाचा पुरेपूर फायदा घेऊन वर्षभरात लाखो आयटी एक्सपर्ट कंपनीमार्फत भरती प्रक्रिया राबवता येईल. उद्योजकांच्या मते कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातून अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना देखील प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल.विशेष म्हणजे ८ ते दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाची सोय करता येईल व त्यांना देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतील.

Sambhajinagar
Sambhajinagar : चिकलठाणा 'IT' पार्कचा कुणी केला कचरा?

कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात तयार झालेले आईटी व्यावसायीक कमी शिकलेल्या युवकांना प्रशिक्षित करतील. यात ८ वी ते १० वी व  बीए, बीकाॅम, बीएससीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात संधी देऊन  ३ ते ६ महिन्याचा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात कोर्स चालु करता येतील. येथे प्रशिक्षण घेणार्यांना नाममात्र शुल्क आकारून कंपनीमार्फत त्यांना रोजगाराची हमी बंधनकारक करता येईल. देश-विदेशातल्यातल्या ख्यातनाम कंपन्यांच्या देखील नजरा चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील आईटी पार्ककडे वळवता येतील. त्यांना देखील येथील उद्योगक्षेत्रात सामील करता येईल. कॅपस मधील प्रशिक्षणार्थ्यांना व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल कंपनींमध्ये क्लस्टर सुरू करता येईल. विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर डिंग्रींसोबत कौशल्य प्रशिक्षण केंद्रात प्रत्यक्षात प्रॅक्टीकल नाॅलेजसह गुणवत्ता प्राप्त करता येईल.  कुठल्याही कंपनीत प्रेझेंटेशन केल्यावर याच विद्यार्थ्यांना मोठ्या पॅकेजवर नौकरी मिळवता येईल.कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात आयटी उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनीना जोडता येईल, असे मत येथील उद्योजकांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com