बीड बायपास आणखी किती बळी घेणार? कोट्यवधींचा चुराडा होऊनही सुविधा कमी अन् असुविधाच जास्त

Beed Bypass
Beed BypassTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगरातील पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा, निपाणीफाटा झाल्टा फाटा ते कॅम्ब्रिज या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम कासवगतीने व निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने झालेल्या रस्त्याच्या कामावर आरपार मोठमोठ्या भेगा पडल्याचे दिसून येत आहे.

Beed Bypass
CAG : हाफकीनचा अंदाधुंद कारभार; 50 कोटींच्या नुकसानीला जबाबदार GM सुभाष शंकरवारना पुन्हा मुदतवाढ कशी?

राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी नवीन मायनर पुलांचे बांधकाम रखडल्याचे दिसून येत आहे, धक्कादायक बाब म्हणजे एका ठिकाणी तर पूलाच्या बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यात गत वर्षी कार कोसळली होती, असे असताना अद्याप पुलाचे काम रखडले आहे. विशेषतः हिवाळे लाॅन्ससमोर खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वाराचा बळी गेल्यानंतर देखील अद्याप सर्व्हिस रस्त्याचे काम केले गेले नाही. एकीकडे काम सुरू असतानाच रस्त्यावर अतिक्रमणाचा बोजवारा वाढल्याने वाहनधारकांना येथून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचा आरोप सातारा - देवळाई संघर्ष कृती समितीचे आबासाहेब देशमुख यांनी केला.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामा दरम्यान देवळाई चौक, संग्रामनगर आणि एमआयटी चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले केले असले, तरी या ठिकाणचा पुलांखालच्या सर्व्हिस रस्त्यांचे काम अद्याप रखडले आहे. मुरूम आणि खडीचे भराव वर्दळीच्या रस्त्यांवर पसरल्याने प्रवाशांना अपघाताचा धोका जाणवत आहे. दुसरीकडे सर्व्हिस रस्त्याचे काम रखडल्याने हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनला आहे.

Beed Bypass
जीव्हीपीआरचा भोंगळ कारभार! ड्रेनेजलाईनवर जलवाहिनी टाकण्याचा प्रताप; दुरुस्तीकडे मात्र कानाडोळा 

बीड बायपास सातारा - देवळाई - बाळापूर - गांधेली मुकुंदवाडी - झाल्टा - सुंदरवाडी आदी गजबजलेल्या वसाहतीतून जात असलेल्या या राष्ट्रीय महामार्गावर काही ठरावीक अंतरावर सर्व्हिस रस्त्याचे काम रखडल्याने चौपदरीकरणालगत साईड पट्टीत पडलेले मोठमोठे खड्डे, दोन्ही बाजूची साईडपट्टी एक ते दीड फूट खोल खचली आहे. त्यामुळे खड्डे चुकविण्याच्या नादात रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होवून अनेकांचे बळी देखील गेले आहेत. तर कित्येकजण जायबंदी झाले आहेत. दुसरीकडे या महामार्गावर वाहतूक सुरू झाली आहे. मात्र काम पूर्ण होण्याआधीच रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्याने टायर त्यात अडखळून अपघाताची शक्यता वाहनधारकांकडून वर्तवली जात आहे.

Beed Bypass
Nashik : केंद्राच्या 100 ई-बसचा डेपो होणार आडगावला

अधिकारी, लोकप्रतिनिधींची डोळेझाक

या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामावर नियंत्रण ठेवणारे प्रकल्प अधिकारी इकडे फिरकत नाहीत. त्यामुळे हा रस्ता म्हणजे अधिकारी, ठेकेदारांचे कुरण बनल्याचे बोलले जात आहे. शासनाकडून रस्त्यावर किमान चारशे कोटी रुपयाचा चुराडा होत असताना वरिष्ठ अधिकारी कामाची पाहणी करण्याचे कष्ट घेताना दिसत नाहीत. त्यामुळे रस्ता तयार करताना कामाचा दर्जा, गुणवत्ता, क्षमता यासाठी लागणारे साहित्य कोणते, किती प्रमाणात वापरायचे, याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com