

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : एकीकडे संभाजीनगर औद्योगिक वसाहतीत देश-विदेशातील नामांकित उद्योजक गुंतवणुकीस तयार असल्याचा आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील उद्योजकांचा गुंडांकडून छळ सुरू आहे. कालच पैठण MIDC मधील एका बड्या नामांकीत उद्योजकाला एका खंडणीबहाद्दराकडून छळ सुरू होता. त्या उद्योजकाला तब्बल चार कोटी व दर महिन्याला २० हजाराचा हप्त्याची एका खंडणीखोराकडून तगादा सुरू होता. अखेर वैतागलेल्या उद्योजकाने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्याचे धाडस केले आणि या विभागाने त्या खंडणीखोराच्या मुसक्या आवळल्या. मात्र, या गंभीर प्रकारामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना पुन्हा धडकी भरली आहे. काही दिवसांपूर्वीच उद्योजकांनी एमआयडीसीकडे खोट्या तक्रारी करून ब्लॅकमेल करणारे, तसेच औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांवरील गौणखनिजाचा अवैध उपसा करणाऱ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर घडलेल्या या खंडणीखोराच्या प्रकरणानंतर कसे येतील संभाजीनगरात उद्योजक अशी चर्चा सुरू आहे.
काय नेमके प्रकरण
पैठण एमआयडीसी येथे शहरातील एका नामांकीत उद्योजकाचा मोठा कारखाना आहे. त्या उद्योजकाच्या कारखान्याविरोधात एमआयडीसी व विविध सरकारी कार्यालयात खोट्या बदनामीकारक तक्रारी करून एका खंडणी बहाद्दराने उद्योजकाला जेरीस आणले होते. पैठण औद्योगिक क्षेत्रात कंपणी चालवायची असेल तर चार कोटीची खंडणी व २० हजार रूपये प्रति महिना द्यावा लागेल, असा तगादा त्याने उद्योजकाच्या मागे लावला होता. अखेर बुधवारी पोलिस अधीक्षकांनी त्याला चांगलाच खाक्या दाखवत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. प्रत्यक्षात त्यास अटकही करण्यात आली आहे व उद्योजकाला खोट्या तक्रारीच्या आधारे बदनामी करण्याच्या धमक्या देत कोट्यावधीच्या खंडणीचा त्याचा इरादा ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला.
पैठण तालुक्यातील मुधळवाडी येथील रहिवासी असलेल्या या ५७ वर्षीय खंडणीखोराचे नाव आहे विष्णू आसाराम बोडखे. १ डिसेंबर २०२२ पासून पैठण औद्योगिक क्षेत्रात मुधलवाडी हद्दीतील उद्योजकाच्या कारखान्यात जाऊन उघोजकासह त्याच्या व्यवस्थापकाला वारंवार मारहाणीच्या धमक्या देत होता. कारखान्याच्या कारभाराबाबत एमआयडीसीसह विविध सरकारी खात्यात खोटे तक्रारअर्ज देऊन कारखान्याची बदनामी करून उद्योजकाला मानसिक त्रास देत त्यांचा व व्यवस्थापकाचा छळ करत होता. यापासून सुटका करायची असेल तर चार कोटी रोख आणि दरमहा वीस हजार द्या, असा तगादाच त्याने उद्योजकामागे लावला होता. त्याच्या मानसिक छळाला वैतागलेल्या उद्योजक व त्याचा व्यवस्थापन अधिकारी याने अखेर पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांची भेट घेवून कैफियत मांडली. यापूर्वी उद्योजकाने बोडखे याला दीड लाख दिल्याचेही कलवानिया यांना सांगितले. मात्र त्याची भूक भागत नसल्याने त्याने पुन्हा कंपनी व्यवस्थनाला वारंवार धमक्या देणे सुरू केले. कंपनीची बदनामी करण्याच्या उद्देशाने परत विधिध सरकारी कार्यालयात कंपनी व्यवस्थापन व कंपनीच्या विरोधात तक्रारी अर्ज करणे सुरू केले होते. यावर त्यास अनेकवेळा कारखाना शासकीय नियम व धोरणानुसारच चालतो याबाबत समजावून सांगितले होते. परंतु तो वारंवार धमकी देवून पैशाची मागणी करतच होता.उद्योजकाच्या व व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिस अधीक्षकांनी तात्काळ दखल घेत बोडखेच्या मुसक्या आवळून गुन्हा धाखल करायचे आदेश दिले. त्यानुसार पैठण पोलिसांनी त्यावर कारवाई केली.
कसे येणार जिल्ह्यात उद्योग
एकीकडे मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, देश-विदेशातील नामांकीत उद्योजकांनी छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी अंतर्गत शेंद्रा, बिडकीन, ऑरिक सिटी आणि वाळूज व चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात गुंतवनूक करावी, यासाठी मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरच्या (मसिआ) वतीने व सीएम एआयच्या वतीने मोठे प्रयत्न केले जात आहेत. पाच महिन्यांपूर्वी शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात मसिआच्या वतीने पाचव्यांदा भव्य ॲडव्हांटेज महाएक्स्पोचे आयोजन केले होते. त्यात तब्बल ७० हजाराहून अधीक उद्योजकांनी भेटी दिल्या होत्या. यावेळी आठ आंतरराष्ट्रीय नामांकीत कंपन्या व चार देशातील नामांकीत उद्योजकांनी छत्रपती संभाजीनगरातील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीस इच्छुक असल्याचे जाहिर केले होते. मात्र येथील उद्योगांसाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर विशेषतः रस्ते, पाणी, भुमिगत गटारी, कारखान्यांसाठी लागणारे स्वतंत्र एसटीपी प्लाॅट आणि मुबलक हवाईसेवा नसल्याने उद्योजक मागार घेतात. त्याचबरोबर येथील गुंडाराज देखील तितकेच कारणीभुत आहे.
येथील महाएक्सपोची जागतिक चर्चा
मसिआने भरवलेल्या ॲडव्हान्टेज महाएक्पोची जागतीक चर्चा झाली होती. त्यामुळे ऑटाेमाेबाइल इंडस्ट्रीजला साेन्याचे दिवस येतील, अशी आशा देखील निर्माण झाली आहे. मसिआ आयोजित ॲडव्हान्टेज महाएक्पो प्रदर्शनात बजाज, टाटा, महिंद्रा, टीव्हीएस, यामाहा, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, जेसीबी अशा विविध कंपन्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे उझ्बेकिस्तान, जर्मनी, जपान, बांगलादेशातील अनेक गुंतवणूकदार आले होते. गुंतवणूकदारांनी ऑरिक सिटीची पाहणी केली होती. तसेच शहरातील विविध कंपन्यांना भेटी दिल्या होत्या. याचा पुरेपूर येथील औद्योगिक क्षेत्राला फायदा पोहोचेल. मात्र उद्योजकांना ब्लॅकमेल करून मानसिक ताप वाढवणाऱ्यांवर आता थेट मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी उद्योजकातून पुढे येत आहे.
"या" आहेत संभाजीनगर औद्योगिक क्षेत्राच्या जमेच्या बाजू
● नोव्हेंबर २०२२ मध्ये आय आयएफएलने जाहिर केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत छत्रपती संभाजीनगरातील सहा उद्योजकांचा समावेश.
● ऑटो हब' म्हणून जागतिक स्तरावरओळख
● बजाज, स्कोडा ,एनड्युरन्स टेक्नोलॉजी, एनड्युरन्स, अशी येथील औद्योगिक वसाहतीत एकूण चार हजार उद्योग आहेत.
● यापूर्वी एकाच वेळी १०० मर्सिडीज खरेदी केल्याची छत्रपती संभाजीनखरची जगभरात चर्चा.
● त्यानंतर अशाच इलेक्ट्रिकल गाड्या देखील उद्योजकांनी खरेदी करून शहराचा नावलौकिक वाढवला.
● त्यात आता उद्योजकांच्या सेवाशुल्कातून ७० कोटी रूपये खर्च करून एमआयडीसीच्या पुढाकाराने रस्ते, पथदिवे , भुमिगत गटारी आदी इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहत असल्याने उद्योग वाढीला याचा निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
● शहरातील रियल इस्टेट उद्योगात जबिंदा गृप, नितिन बागडिया आणि मनजीत प्राईड यांचे गरजूंसाठी भव्य आणि देखने गृहप्रकल्प
● सोबतच विनोद सुराणा, नितिन बगडीया मनजीत प्राईड यांच्या प्रयत्नाने चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत उभारलेला भव्य आयटीपार्क यात एक्सपर्ट ग्लोबल, जेएलएल गेब्जस हेल्थकेअर सारख्या नामांकीत उद्योजकांनी गुंतवणूक केल्याने येथे जवळपास पाच हजार सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.