मराठवाड्यातील परभणी, नांदेड जिल्ह्यांसाठी गुड न्यूज!

परभणी विभागासाठी नवीन सी-बँड रडार मंजूर केल्याची राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांची माहिती
मराठवाड्यासाठी चांगली बातमी
MarathwadaTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : 'मिशन मौसम’ योजेनेंतर्गत परभणी विभागात नवीन सी-बँड रडार बसविण्याच्या प्रस्तावास केंद्र सरकारने मंजूरी दिली असल्याचे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

यामुळे मराठवाड्यात हवामान अंदाजासाठी अत्याधुनिक डॉपलर वेदर रडार बसविण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

मराठवाड्यासाठी चांगली बातमी
Pune: पीएमआरडीएचे काम अन् आणखी 2 महिने थांब!

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी पाठविलेल्या पत्रात पुढे नमूद केले आहे की, सोलापूर येथे आधीपासून कार्यरत असलेला २५० कि.मी. परिघाचा डॉपलर रडार सध्या परभणी आणि नांदेड परिसरातील हवामान निरीक्षणासाठी वापरला जात आहे. तसेच ‘मिशन मौसम’ योजनेंतर्गत परभणी भागात आणखी एक नवीन सी-बँड रडार बसविण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारने मंजूर केला आहे.

मराठवाडा हा दुष्काळप्रवण प्रदेश असून शेतकऱ्यांना वेळेवर हवामानाची अचूक माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम अत्यंत आवश्यक होता. केंद्र सरकारकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आता हवामान अंदाजासाठी आपली क्षमता अधिक बळकट होईल, असा विश्वास बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

मराठवाड्यासाठी चांगली बातमी
जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार देणार; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

संभाजीनगर येथे काम सुरू

केंद्र सरकारकडे परभणी येथे हवामान निरीक्षणासाठी डॉपलर रडार बसविण्याची मागणी केली होती. ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याने म्हैसमळ टेकडी, छत्रपती संभाजीनगर येथे सी-बँड प्रकारचा २५० कि.मी. परिघाचा रडार बसविण्याचे काम सुरू आहे. या केंद्रामुळे मराठवाडा विभागातील हवामान निरीक्षण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील शेती, पीक संरक्षण, हवामान पूर्वसूचना व आपत्ती व्यवस्थापनाला मोठा हातभार लागणार असल्याने राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com