Sambhajinagar : राष्ट्रीय महामार्ग की ‘कचरा’मार्ग? 'या' ठिकाणी साठणाऱ्या कचऱ्यामुळे वाहतुकीस अडथळा

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-जालना, पैठण जंक्शन ते कॅम्ब्रीज चौक, सोलापुर-धुळे एन एस -५२, सावंगी बायपास, नगर नाका ते पुणे या सर्वच राष्ट्रीय महामार्गांवर जवळपास दर अर्धा किलोमीटर अंतरावर कचऱ्याचे ढीग साठले आहेत. मुख्य महामार्गालगत तसेच महार्मागाच्या सेवा रस्त्यावर हे कचऱ्याचे ढीग साठले असून, त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. विशेषतः कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना आग लावली जात असल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेसह त्या-त्या हद्दीतील ग्रामपंचायत, नगरपालिका व नगरपरिषदांना राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

Sambhajinagar
Pune : ठरलं तर! पुण्यातील 'त्या' नागरिकांचा महापालिका वाजविणार 'बँड'

उपरोक्त उल्लेखीत राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे परिसर तर अस्वच्छ झालाच आहे, शिवाय परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. शिवाय वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. या पूर्वीही "टेंडरनामा"च्या वृत्तानंतर महामार्ग प्राधिकरणाकडून महापालिकेसह संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका व नगरपरिषदांना अशा ठिकाणांची यादी दिली होती. मात्र, कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे टेंडरनामा पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे संबंधित प्राधिकरणाकडून कचरा टाकण्यात येणाऱ्या जागांचे सर्वेक्षण करून त्यानंतर या सर्व ठिकाणींची यादीच महापालिकेसह ग्राम पंचायत, नगरपालिका व नगरपरिषदांना पाठविणे गरजेचे आहे.

Sambhajinagar
Devendra Fadnavis : मानवी संसाधनाचेही सर्वोत्तम केंद्र म्हणून नागपूरला विकसित करणार 

राष्ट्रीय महामार्गावरच जाळला जातोय कचरा

एकीकडे शहर आणि गावागावांतील हवा प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी राष्ट्रीय महामार्गावरील मोकळ्या जागेत कचरा जाळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होणे, श्‍वास घेताना त्रास होणे असे प्रकार  घडत आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर कचरा जाळणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर प्रशासनाची जरब नसल्याचे समोर आले आहे. शहरात आणि गावखेड्यात होणारी बांधकामे, विविध विकास प्रकल्प, वाहनांचा धूर, कचरा जाळणे आदी कारणांमुळे धुळ आणि धूर उडून हवा प्रदूषण वाढते. हिवाळ्यामध्ये याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होतो. दिल्ली, मुंबई, छत्रपती संभाजीनगर यासह इतर शहरांमधील स्थिती चिंताजनक असल्याने केंद्र व राज्य सरकारने नियमावली तयार केली असून, याची अंमलबजावणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून केली जात आहे.

Sambhajinagar
Nagpur : बुटीबोरीत 88 एकर क्षेत्रावर होणार डिस्टिलरी प्रकल्प

छत्रपती संभाजीनगर शहरात नदीपात्र, विविध घाट, पूल, नाले, राष्ट्रीय महामार्ग, रस्त्यांवर  कचरा टाकण्याचे आणि जाळण्याचे प्रमाण मोठे आहे. प्रमुख रस्त्याला लागून अशी ठिकाणे असली तरीही प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात नाही. त्यामुळे या भागातील रहिवासी, वाहनचालक यांना त्रास सहन करावा लागतो. महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके तयार केलेली असली तरीही वारंवार कचरा पेटविला जातो अशा ठिकाणी कारवाईचे प्रमाण वाढवले जात नाही. एक दोन कारवाया करून पथक निघून जात असल्याने या कारवाईचा प्रभाव दिसून येत नाही. मध्यवर्ती भागासह शहरातील विविध भागात सर्रास ओला सुका कचरा जाळला जातो. त्याची प्रचंड दुर्गंधी निर्माण होते. शहरातील सुखना व खाम नदी व नाल्यांमध्ये कचरा फेकू नये यासाठी बहुतांश सर्व पुलावर लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. पण बेशिस्त नागरिक हातातील पिशवी या जाळिच्यावरून नदी व नाल्यात भिरकावून देत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळते. हवा प्रदूषण कमी करण्यासाठी कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर व जाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेसह त्या-त्या मार्गावरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पथके नियुक्त करणे अपेक्षित आहे. रोज जास्तीत जास्त कारवाई करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या जाव्यात.नागरिकांनी त्यांचा कचरा उघड्यावर न फेकता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे, घंटागाडीत देऊन शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे म्हणणे आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com