छत्रपती संभाजीनगरातील 'या' महत्त्वाच्या रस्त्याची खड्डयांमुळे चाळण; निधी मंजूर पण कामाकडे दुर्लक्ष

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील अत्यंत गजबजलेल्या खासगेट ते रोशनगेट या रस्त्याची गेल्या ३० वर्षांपासून चाळण झाली आहे. सद्यस्थितीत या रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. या रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी निधी मंजुर झाला आहे. मात्र अद्याप रस्त्याचे काम हाती घेतले जात नसल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील माजी नगरसेवक मोहसीन अहमद यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : शिक्षक भरती घोटाळा; बदली प्रकरणात कशी केली अनियमितता, काय आहे चौकशी अहवालात?

खासगेट ते रोशनगेट हा सुमारे दोन किलोमीटर लांबीचा रस्ता महापालिका बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्याची दुरुस्ती मागील तीस वर्षात झालेली नाही. सालाबादप्रमाणे पाऊस सुरू होताच रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागतात. खड्डयांमुळे लहान मोठे अपघात देखील झाले आहेत. या अत्यंत अरूंद रस्त्याच्या दोन्ही बाजूने दाट वसाहती आणि मोठी बाजारपेठ आहे. याशिवाय रोशनगेटकडून चंपाचौक, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय तसेच पंचायत समिती, जिल्हा भूमिअभिलेख कार्यालय तसेच व्हीआयपी रस्त्याला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. याशिवाय उत्तरे कडील वसाहतींना दक्षिणेकडे असलेला जुना मोंढाकडे येण्यासाठी हा महत्वाचा रस्ता आहे. याशिवाय या रस्त्यावर काही मोठ्या शाळा देखील असल्याने ग्राहक , स्थानिक भागातील रहिवासी शहरभरातून या भागाचा वापर करणार्या प्रवाशांना पावसाळ्यात खड्डे त्यात साचलेले पाणी इतर दिवसात धुळीचा सामना करावा लागतो. यामुळे या रस्त्याचे खड्डे भरणे गरजेचे असल्याचे मोहसीन अहमद यांनी सांगितले.

Sambhajinagar
Mumbai : कोस्टल रोडसाठी आणखी सहा महिन्यांची प्रतीक्षा; ठेकेदाराकडून मुदतवाढीसाठी पत्र

छत्रपती संभाजीनगर महापालिकेला या रस्त्याची दुरुस्ती करण्याची आठवण पडली आहे. पावसाळ्यात नागरिकांना पाऊस सुरू होताच पुन्हा रस्त्याला खड्डे पडत असल्याने या मार्गाकडून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. या भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.विशेषत: मनपाच्या
शंभर कोटीतील काम करणाऱ्या कंत्राटदाराने खासगेट समोरील रस्त्त्याचे काम न करता मुख्य रस्त्यावर खड्डा तसाच आहे. त्यामुळे जिंन्सी-रेंगटीपुर्याकडुन गंजे शहिस्ता कब्रस्तानाकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सिडको-हडकोला जुन्या शहराशी जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. जुन्या मोंठ्यातील किराणा मालवाहू रिक्षांचा या मार्गावररून मोठा फेरा होत असतो. त्यामुळे खास गेटसमोरील मुख्य रस्त्यावरील खड्डा तातडीने दुरूस्त करण्याची मागणी येथील रहिवासी, व्यापारी व प्रवासी करत आहेत 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com