Sand
SandTendernama

Sambhajinagar : सरकारच्या वाळू धोरणाकडे ठेकेदारांची पाठ

Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : वाळूच्‍या अवैध वाहतुकीसह तस्‍करीला आळा घालण्‍यासाठी सरकारने नव्‍या वाळू धोरणाची घोषणा केली आहे. त्‍यामुळे नागरिकांना बांधकामासाठी लागणारी वाळू आता थेट अधिकृत डेपोवरून विकत घेता येणार आहे. जिल्‍ह्यात ७ ठिकाणी ‘वाळू डेपो’ चालू केले जाणार आहेत. त्‍यासाठी जिल्‍हा खनिकर्म विभागाद्वारे टेंडरही प्रसिद्ध करण्‍यात आली आहेत. त्‍यानुसार १८ वाळू घाटांतून वाळू उपसा करून ७ वेगवेगळ्‍या डेपोंमध्‍ये ती जमा केली जाणार आहे. याच डेपोंमधून नागरिकांना ६०० रुपये ब्रासप्रमाणे वाळू विकत घेता येणार आहे. मात्र त्यासाठी डेपो आणि डेपोपर्यंतची वाहतूक व्यवस्थापन व विक्री यासाठी जिल्हा गौण खनिज विभागाने काढलेल्या टेंडरला प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे.

Sand
मोठी बातमी; केंद्राने Bullet Train प्रकल्पांचे काम थांबविले, कारण

यासाठी ५ मे या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत 'टेंडर' प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी जिल्हा गौण खनिज अधिकारी कार्यालयामार्फत ठेकेदारांना आवाहन करण्यात आले होते. मात्र अद्याप त्याला प्रतिसाद न मिळाल्याचे 'टेंडरनमा' तपासात समोर आले आहे. परिणामी त्यास ९ मे दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. यासंदर्भात गौण खनिज अधिकार्यांना विचारले असता ऑनलाईन प्रणाली आहे, किती व कोणी टेंडर भरले हे आज सांगु शकत नाही. उद्या टेंडर ओपन होणार असल्याचे ते म्हणाले.यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता पावसाळा तोंडावर असल्याने वाळू उत्खनन लांबणे, वाहतूकीचा खर्च अधिक होणे, ही खरी कारणे असल्याने ठेकेदार प्रतिसाद देत नसल्याचे समोर आले. पहिल्या मुदतीत ५ डेपोसाठी फक्त ३ ठेकेदार इच्छुक असल्याचे समजते.

Sand
Sambhajinagar: अखेर प्रशासकांनी कॅनॉट व्यापाऱ्यांसोबत बोलावली बैठक

जिल्‍ह्यात गेल्‍या काही दिवसांपासून वाळू माफियांचा हैदोस पहायला मिळत आहे. त्‍यामुळे वाळूच्‍या किमती गगनाला भिडल्‍या आहेत. सर्वसामान्‍य नागरिकांना घराचे बांधकाम करणे अवघड झाले आहे. विशेष म्‍हणजे यामध्‍ये सर्वांचेच हितसंबंध असल्‍याने तस्‍करी रोखणे शक्‍य होत नाही. माफियाराज रोखण्‍यासाठी आणि नागरिकांना स्‍वस्‍तात वाळू मिळावी, यासाठी या वर्षी शासनाने नवे वाळूचे धोरण आणले आहे. त्‍यानुसार आता वाळू घाटांचे लिलाव रहित करून वाळू डेपो सिद्ध करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

Sand
Sambhajinagar: 'MIDC'ला खोट्या तक्रारीनी पछाडले; उद्योजक धास्तावले

या वर्षी जिल्‍ह्यातील २१ वाळू घाटांना राज्‍यस्‍तरीय समितीने संमती दिली होती; परंतु त्‍यातील ३ वाळूघाट पाणीपुरवठा योजनांसाठी राखीव ठेवण्‍यात आले आहेत. त्‍यामुळे १८ वाळू घाट उपशासाठी सिद्ध आहेत. नव्‍या वाळू धोरणानुसार जिल्‍ह्यात पैठण तालुक्‍यात पैठणवाडी, सिल्लोड तालुक्‍यातील मोढा, वैजापूर तालुक्‍यातील झोलेगाव, डाग पिंपळगाव, फुलंब्री तालुक्‍यातील गेवराई गुंगी, कन्‍नड तालुक्‍यातील देवगाव रंगारी आणि सिल्लोड तालुक्‍यातील बोरगाव कासारी या ७ ठिकाणी वाळू घाट सिद्ध करण्‍यात आले आहेत.

Tendernama
www.tendernama.com