'एमएसआरडीसी'चे अधिकारी खोटारडे; ठेकेदाराने उड्डाणपुलाची दुरुस्ती..

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील जळगाव टी पाॅईंट उड्डाणपुल अजूनही खड्ड्यातच आहे. उड्डाणपुलाच्या दुरूस्तीबाबत वारंवार खोटी आश्वासने एमएसआरडीसीचे अधिकारी आणि कंत्राटदार देत आहेत. मात्र, खोटे बोलून अधिकारी आणि कंत्राटदार एकमेकांना पाठीशी घालत आहेत. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारणारा लोकप्रतिनिधी देखील औरंगाबादकरांच्या नशिबी नाही.

Aurangabad
कल्याण-शीळ फाटा रस्त्याचे सहापदरीकरण; ५६१ कोटीच्या खर्चास मान्यता

मुख्यमंत्र्यांचा ताफा खड्ड्यातून पण...

विशेष म्हणजे मी जिथे असेल तिथे मंत्रालय, जिथे समस्या दिसेल तेथूनच अधिकाऱ्यांचे कान उपटणार आणि समस्या निकाली काढणार, असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा सलग दोन दिवस याच खड्ड्यातून पार झाला. मात्र त्यांनी देखील दखल घेतली नाही. परिणामी आपल्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचा पुरेपूर फायदा घेत अधिकारी आणि कंत्राटदार देखभाल-दुरूस्तीच्या कालावधीत केवळ कागदावर दुरूस्ती दाखवत कोट्यावधीची बिले उचलत असल्याचा संशय बळावत आहे.

Aurangabad
मुंबई मेट्रो-3 साठी 147 कोटी; 'एमआरव्हीसी'ला 600 कोटी

सिडकोतील औरंगाबाद- जालना राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीची कोंडी फोडण्यासाठी व अपघाताची मालिका खंडित करण्यासाठी सरकारी तिजोरीतून ५६ कोटी २५ लाख रूपये खर्च करत जळगाव टी पाॅईंट येथे उड्डाणपूलाची निर्मिती करण्यात आली. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळावर संपुर्ण बांधकामाची जबाबदारी टाकण्यात आली होती. टेंडरमध्ये यशस्वी झालेल्या मुंबईतील रंजन मिश्रा या ठेकेदाराच्या मे. जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया) प्रा.लि. कंपनीला १३ फेब्रुवारी २०१४ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती.२० जुन २०१६ मध्ये त्याने प्रकल्प पुर्ण केला होता. त्यानंतर ९ वर्ष पुलाच्या देखभाल दुरूस्तीची त्याच्याकडे जबाबदारी होती.

Aurangabad
औरंगाबाद पालिकेचा महाप्रताप; आता पॅचवर्कच्या नावाखाली रस्त्यांवर..

अधिकारी-कंत्राटदाराची मिलिभगत

मात्र, एकदा प्रकल्प पुर्ण झाल्यावर ठेकेदाराने पूलाच्या देखभालीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. नियमानुसार प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू होण्यापुर्वी संबंधित कंत्राटदाराकडून एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांनी पुलाची धावपट्टी आणि पुलाच्या जोडरस्त्यांचे नुतनीकरण करणे, तसेच पाण्याचा निचरा करणारे पाईप आणि स्पाॅट होल दुरूस्ती करणे, रस्त्यालगत व दुभाजकातील गवत काढणे, पुलाच्या कठड्यातील वड, पिंपळाची धोकादायक झाडी काढणे, रस्त्यावर पसरलेल्या खडी, मातीची झाडलोट करणे आदी कामाची जबाबदारी असताना अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला जागे करण्याचा प्रयत्न केलाच नाही. यावरून अधिकारी आणि कंत्राटदाराची मिलिभगत असल्याचा संशय बळावतो.

भरली खड्ड्यांची जत्रा

कंत्राटदाराने देखभाल दुरूस्तीअंतर्गत कुठलीच डागडूजी न केल्याने पूलाखालचे जोड रस्त्यांसह उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलांवरील धावपट्टीचे डांबर निघून गेले आहे. पूर्णतः सरफेस उखडल्याने पूलावरील धावपट्टीच्या चढ-उतारावर खडीच खडी पसरल्याने धावपट्टीची घसरगुंडी झाली आहे. त्यात अशा ठिकाणी वाहनाचे चाके रुततील एवढ्या आकाराचे हे खड्डे पडले आहे. अशा खड्ड्यांतून आणि पसरलेल्या खडीतून वाट काढताना दुचाकीस्वारांचा अपघात होण्याची शक्यता आहे. चारचाकी वाहन चालकांना देखील खड्ड्यांचा त्रास होत आहे. अनेकदा वेगात आलेले वाहन नियंत्रणात न आल्यास खड्ड्यांमध्ये चाके आदळून वाहनांचे स्पेअर पार्टचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

Aurangabad
औरंगाबाद : 'त्या' अभियंता, ठेकेदाराच्या कामावर न्यायालय संतप्त

पावसाने केली खाबुगिरी उघड

पावसामुळे उड्डाणपूल खड्डेमय झाला आहे. उड्डाणपुलावर आणि पूलाखालच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलावर वाहने चालवताना अचानक खड्डा समोर येत असल्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही दिवस पावसाने चांगला जोर धरला आहे. त्यात पुलावरील पाण्याचा निचरा करणारे पाईप आणि पूलाखालील गटारे स्वच्छ नसल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबते.

खोटारडे अधिकारी अन् कंत्राटदार

पावसाळ्यापुर्वी खड्डे बुजवण्यात आल्याचा व रस्त्याच्या थरावर डांबरीकरण केल्याचा दावा जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया) प्रा. लि. मुंबईतील वरिष्ठ अभियंता सौरभ जावळीकर यांनी केला होता. यात त्यांनी मे महिन्यात पूलाची धावपट्टी आणि जोड मार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम केल्याचे सांगितले होते. टेंडरनामाने कंत्राटदाराच्या कामाचा भांडाफोड करताच मुख्य अभियंता बी.पी.साळुंखे यांनी उड्डाणपुलाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी अद्याप कंपनीच्या खांद्यावर आहे. मागील काही दिवस पावसाची संततधार सुरू असल्यामुळे खड्डे पडतात. पावसाळ्यात काम करण्यास तांत्रिक अडचणी येतात. परंतु पावसाने उसंत घेतल्यानंतर खड्डे बुजवण्यास सुरुवात केली जाईल. खडी व वाळुची तीन दिवसात झाड लोट केली जाईल असे सांगितले होते.

मुख्य अभियंताच खोटारडे

परंतु, दरम्यान पुलावर पसरलेली खडी झाडलोट करत अधिकाऱ्यांनी दुरूस्तीचे आश्वासन देखील पुर्ण केले नाही. असे खोटारडे अधिकारी असतील तर दुरूस्ती कशी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. अधिकारी जबाबदारी पार पाडत नसतील तर 'त्या' पदाचा उपयोग काय. कंत्राटदाराकडून काम करून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांचीच आहे. मात्र प्रत्येक वेळी प्रश्न उपस्थित केल्यावर मुख्य अभियंता बी. पी. साळुंखे हे उपअभियंता अशोक इंगळे आणि कंत्राटदाराला खड्डे बुजवण्याचे सांगितले आहे. पाऊस उघडल्यावर काम होईल, असे म्हणत वेळ मारून नेतात.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com