छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील कारभाऱ्यांच्या दालनांवर पुन्हा कोट्यवधींचा चुराडा कशासाठी?

 Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरातील ९ झोनमधील ११८ वार्डांचा कारभार पाहिला जात असलेल्या महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढत चालला आहे. देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळण सुरू आहे. दुसरीकडे शहरातील अनेक भागात मलनिःसारण वाहिन्या फुटलेल्या आहेत, फुटपाथवर मोठमोठी भगदाडं पडलेली आहेत. शहरात आठ ते दहा दिवस पाणीपुरवठा होत नाही. खुल्या मैदानांची आणि बागांची भयानक दुरवस्था असताना सालाबादप्रमाणे कारभाऱ्यांच्या दालनांवर वारेमाप खर्च कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.

 Sambhajinagar
Nashik : रोजगार हमीच्या 60:40चे प्रमाण बिघडण्यास जबाबदार कोण? मंत्री की अधिकारी?

शहरी भागाचा कारभार पाहिला जात असलेल्या शहरातील महानगरपालिकेच्या जुन्या मुख्य व प्रशासकीय इमारतीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढत चालला आहे. इमारतीची नियमित साफसफाई, विजेचे बिल या कामांवर मागील दोन वर्षात तब्बल अडीच ते तीन कोटी रुपये खर्च झाले आहेत. पदाधिकारी व अधिकाऱ्यांची दालने चकाचक करण्यासाठीही वारेमाप खर्च केला जात आहे.

दुसरीकडे मात्र निधी कमी असल्याचे कारण पुढे करून शहरातील साध्या मलनिःसारण वाहिनी, चेंबर, जलवाहिनींची दुरूस्ती उद्याने आणि क्रीडांगणांची देखभाल केली जात नाही. शहराच्या कल्याणकारी कल्याणकारी योजनांचा निधी मात्र कापला जात आहे.

 Sambhajinagar
Sambhajinagar : सिडकोला अंधारात ठेऊन विनाटेंडर केला झालर क्षेत्राचा आराखडा

महानगरपालिकेच्या दोन इमारती आहेत. एक जुनी व टाऊन हॉलला लागून मुख्य प्रशासकीय इमारत आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त तसेच जी -२० परिषदेनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील मूलभूत सोयी -  सुविधांसाठी दिलेल्या विकास निधीतून चक्क पाच कोटी रुपये कारभाऱ्यांच्या दालनांच्या देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली उधळले जात आहेत.‌

विशेषतः नियमानुसार मुख्य इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्वनिधीतून तरतूद केली जाते. मात्र शहरातील पायाभुत सुविधांसाठी दिलेला सरकारी निधी वळवत इमारतीच्या कामांसाठी निधी वापरला जात असून दरवर्षी कोट्यवधी रुपये या कामांवर खर्च होत आहेत. इमारतीत प्रत्येक विभाग स्वतंत्र आहे. पदाधिकारी, अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालने आहेत. स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. या सर्व बाबींची वेळोवेळी देखभाल करणे, दालनांची दुरुस्ती, कार्यालयांच्या वीज बिलांचा खर्च तसेच बड्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची देखभाल, परिसराची स्वच्छता या बाबींवर खर्च करावा लागत आहे.

 Sambhajinagar
Nashik ZP : जिल्हा परिषदेत ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन कामाचा वाढला वेग; 8 दिवसांत 24 कोटींची देयके तयार होऊन मंजूर

मागील वर्षाच्या काळात या बाबींवर तब्बल ६ कोटी ५० लाख ३२ हजार रुपये खर्च झाले आहेत. देखभाल दुरुस्ती वेळोवेळी करावी लागत असल्याने या कामांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करुन दिला जात असला तरी इमारतीची मात्र दुर्दशा झाली आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने भिंतींचे कोपरे अस्वच्छ झाले आहेत. तरीदेखील खर्चाचे आकडे पाहता हा खर्च नेमका कशावर होत आहे, याबाबत शंका उपस्थित केला जात आहेत.

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या नवीन सभागृहाचे काम मागील अडीच वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. दरम्यान टेंडरनामाने प्रत्यक्षात पाहणी केली असता, महानगरपालिका आयुक्तांचे दालन आणि बैठक हाॅलचे काम अंतिम टप्प्यात दिसून आले.‌ विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीच तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी यांच्या कालावधीत अधिकाऱ्यांच्या दालनांची दुरुस्ती केली असताना पुन्हा नुतनीकरणाचा घाट घातला जात आहे.‌ एकीकडे विकासकामांसाठी तिजोरीत खडखडाट दाखवला जात आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांची दालने सजवण्यात कोट्यवधींचा चुराडा केला जात आहे.‌

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या इमारतीचे बांधकाम तीन टप्प्यात झालेले आहे.‌ यातील सभागृहाचे बांधकाम १९९५ साली पूर्ण झाले होते. हे सभागृह होण्यापूर्वी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीसह इतर बैठका टाऊन हाॅलमध्ये होत असत.‌ यापूर्वी सभागृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठी महानगरपालिकेने किरकोळ खर्च वगळता मोठा खर्च केला नव्हता. त्यामुळे या सभागृहाची दुरवस्था झाली होती.‌ सभागृहातील आसन व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा काम करत नव्हती. अधिकाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नव्हती.‌ तर पत्रकार गॅलरी कोसळण्याच्या मार्गावर होती.

त्यामुळे २०२२ मध्ये तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांण्डेय यांनी या सभागृहाच्या बांधकामासाठी पाच कोटी रुपयांचा निर्णय घेतला होता.‌ मात्र सद्यस्थितीत हे काम सात कोटींवर गेले आहे.‌ मागील अडीच वर्षांपासून हे काम कासवगतीने सुरू आहे. त्यात शहरातील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने दिलेल्या निधीतून कारभाऱ्यांच्या दालनांचे सुशोभीकरण व नुतनीकरण करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com