प्राचीन खारुळमातेला मंत्रिमहोदय पावतील? पर्यटनस्थळ म्हणून विकासाची

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : एकीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी कोट्यावधीच्या विकास आराखडा तयार करण्याच्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या घोषणा. तर, दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील चिकलठाण्यातील ऐतिहासिक पुरातन हेमाडपंथी खारूळ माता मंदिराकडे पुरातन विभागाचे झालेले दुर्लक्ष (रेणूका मातामंदीर), असे विरोधाभासी चित्र विभागामध्ये आहे. 

Aurangabad
'या' पुलामुळे अलिबाग, नवी मुंबई येणार आणखी मुंबईजवळ; 900 कोटींचे

कोण काय म्हणाले...

यासंदर्भात मंदीराचे पुजारी एकनाथ गिरी यांना विचारले असता २०१८-१९ मध्ये माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदार संघाचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांनी डीपीडीसीच्या निधीतून मंदिराच्या सभामंडपासाठी १० लाखाचा निधी मंजूर केला होता. मात्र, काम झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावर प्रतिनिधीने थेट बागडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हे महापालिकेच्या हद्दीतील क्षेत्र आहे, महापालिकेला विकासकामासंदर्भात कळवू असे ते म्हणाले. दुसरीकडे त्यांचे स्वीय सहाय्यक मंदार देशपांडे यांच्याकडे विचारणा केली असता, मंदिराकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने बांधकाम साहित्याच्या गाड्या जात नसल्याने सभामंडपाचे बांधकाम रखडल्याचे त्यांनी सांगितले. यातून संबंधित आमदारांचे रस्त्यासाठी देखील प्रयत्न नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात सहकार मंत्री अतुल सावे यांना विचारले असता डीपीडीसीच्या निधीतून रस्ता आणि सभामंडप तयार करू असे ते म्हणाले.

Aurangabad
'तो' प्रकल्प नाणारमध्येच; भूसंपादनाला विरोध करणारी गावे वगळणार

पर्यटन धार्मिक स्थळाच्या विकासाच्या नुसत्याच बाता 

औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या दृष्टीने वेरूळ-अजिंठा लेणी, अहिल्यादेवी कुंड, घृष्णेश्वर मंदिर, दौलताबाद किल्ला (Daulatabad Fort) येथे रोप वे आणि लाइट साउंड शो बसवणे, औरंगाबाद लेण्या (Aurangabad Caves), हनुमान टेकडी येथे रोप वे उभारण्यासंदर्भात दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पर्यटन विकासासाठी सर्व प्रकल्पांचे डीपीआर तयार करण्याच्या सूचना  केंद्रीय पर्यटन खात्याचे सचिव अरविंद सिंग, आयटीडीसीचे केव्ही राव, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या महासंचालक विद्यावती, राजेंद्र लोढा यांना केल्या होत्या.

केवळ प्रसिद्धीसाठीच सूचना का?

मात्र, या बैठकीत केवळ स्काय या खासगी संस्थेच्या वतीने रोप वे बसवण्यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. मात्र भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संचालक विद्यावती यांनी संबंधित कन्सल्टंटला डीपीआर बनवण्यासंदर्भात दिलेल्या सूचना कागदावरच राहिल्या. बीबी का मकबरा येथे लाइट अँड साउंड शो, व इतर ठिकाणी रोपवेची कामे झालीच नाहीत. या बैठकीत दौलताबाद किल्ल्यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर निधीतून रोप वे टाकण्याचे काम. तसेच वेरुळ मंदिरात ग्रामीण विद्युतीकरण पब्लिक सेक्टर युनिटच्या माध्यमातून लाइट अँड साउंड शो व औरंगाबादेतील सोनेरी महल येथेही असे शो बसवण्यात येतील असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात यातील एकही प्रकल्प मार्गी लागला नाही. त्यामुळे केवळ प्रसिध्दीसाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची बैठक होती , की काय असा सुर उमटत आहे.  

Aurangabad
नाशिक जिल्हा परिषदेसमोर पाच महिन्यांत ५०० कोटी खर्चाचे आव्हान

निदान अशा धार्मिक स्थळांकडे लक्ष द्या

औरंगाबाद तालुक्यातील चिकलठाणा येथे साडेतीनशे वर्ष जुने खारूळ नदीच्या काठी रेणूकामातेचे पुरातन हेमाडपंथी मंदिर दुर्लक्षित आहे. या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केंद्राचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे तसेच माजी विधानसभा अध्यक्ष तथा विद्यमान आमदार हरीभाऊ बागडे यांच्याकडे आहे. त्यांनी पूर्ण क्षमतेनिशी या ऐतिहासिक धार्मिक स्थळाच्या जिर्णोध्दारासाठी जोर लावला तर अशक्य ते शक्य होईल.मात्र, फक्त पाच वर्षांत एकदा येणार्या निवडणूकीपूर्वी  फुलंब्री  विधानसभा आणि जालना लोकसभा क्षेत्रात असलेल्या या  प्राचीन मंदिराच्या विकासकामांच्या बाता केल्या जातात. नंतर मंदिराकडे दुर्लक्ष केल्याने ते आता शेवटच्या घटका मोजत आहे. चिकलठाण्यातील रामनगर-मुर्तिजापूर दरम्यान खारूळ आणि सुखना नदीच्या संगमावर रेणूकामातेचे कोरीव दगडामध्ये बांधलेले हेमाडपंथी प्राचीन  मंदिर आहे. पुरातत्त्व खात्याच्या येथे  प्राचीन मंदिर असल्याचे गावीही नाही. गावकर्यांच्या प्रयत्नाने हे  हेमाडपंथी मंदिर बर्‍यापैकी सुस्थितीत आहे.जवळपास पाच पिढ्यांपासून चिकलठाण्यातील गिरी कुटुंबीय या मंदिराचे सेवेकरी आहेत.

कानाकोपऱ्यातून भाविक येतात

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील ३५८ तालुक्यातील भाविक चैत्र -पौर्णिमेत साजरा केला जाणारा यात्रोत्सव तसेच  नवरात्र आणि दिवाळी दसर्यात देवीच्या दर्शनासाठी कोसोदूर मैलावरून येतात.

चिकलठाण्यासह जिल्हा ग्रामदेवता

औरंगाबाद जिल्ह्यातील ९ तालुक्यातील १२८० खेड्यातील ग्रामस्थ भाविकांची मंदिरात सतत रेलचेल असते. चिकलठाण्यातील अशोक दहिहंडे यांच्या गट क्रमांक ५८४ मध्ये हे देवीचे मंदिर आहे. यापूर्वी अडगळीत असलेल्या या मंदिराकडे चिकलठाणा ते गांधेली असा रस्ता होता. जिल्ह्यातील अनेक ग्रामस्थांची ग्रामदेवता म्हणून मंदिराची ओळख आहे.

माजी खा.चंद्रकांत खैरे पावले

विमानतळाच्या विस्तारीकरणात रस्ता बंद झाल्याने शिवसेनेचे माजी उप महापौर भाऊसाहेब वाघ यांच्या काळात अर्थात सन २००३ ते ०४ या दरम्याण आजूबाजूच्या काही शेतकर्यांनी मंदिरासाठी शेतजमीन देत  माजी खासदार तथा माजी गृहनिर्माण व स्वच्छता मंत्री चंद्रकांत खैरे यांच्या दहा लाख निधीतून जुना बीडबाय (हॅप इंग्लीश स्कुल समोरून ) ते मंदिरापर्यंत एक कि.मी.चा कच्चा मातीचा रस्ता तयार केला. मात्र अरूंद असलेला  रस्ता त्यात कमरेऐवढे खड्डे अन् पावसाळ्यात घसरगुंडीचा खेळ करत जावे लागत असल्याने भाविकांचे हाल होतात.  परिणामी जुन्या बीडबायपासवर वाहनांच्या रांगा लावत भाविकांना एक कि.मी. पायपीट करत दर्शनासाठी जावे लागते. 

संवर्धनासाठी ठोस कृती नाही

मंदिराच्या शेजारीच ऐतिहासिक बारव, कानाकोपर्‍यात तुटलेल्या मूर्ती, कोरीव दगडांचे अवशेष विखुरलेले दिसतात. मात्र, एवढा पुरातन ठेवा असूनही मंदिराच्या संवर्धनासाठी ठोस कृती नाही. आमदार बागडे यांनी केवळ सभामंडपासाठी डीपीसीडीमधुन प्रयत्न केले होते. मात्र बांधकाम झालेच नाही. येथे येणाऱ्या भक्तांसाठी कोणत्याही सुविधांची निर्मिती नाही. सभामंडप आणि भाविकांसाठी निवार्याची सोय नसल्याने पानकळ्यात हाल होतात असे येथील भाविकांनी सांगितले.

संवर्धनासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

दरवर्षी चैत्र-पौर्णिमेत येथे मोठी यात्रा भरते. दिवाळी दसऱ्यात मोठे सिमोल्लंघन साजरे केले जाते. नवरात्रोत्सव साजरा केला जातो. जागरण गोंधळ केले जातात. राज्यातील कानाकोपऱ्यातील भाविक नवस फेडायला येतात. मात्र येथे धड रस्ता नाही. महिला व पुरूषांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. पाण्याची सोय नाही. नवरात्रात ९ दिवस अनुष्ठाणाला बसणार्या भाविकांच्या अंगावर पत्र्याच्या सभामंडपातून पाणी टपकते. ताडपत्रीचा जुगाड फेल होतो. हे प्राचीन मंदिर अनेकांची कुलदेवता असल्याने राज्यभर प्रसिध्द आहे. पण भाविकांचे हाल पाहीले जात नाहीत.

- गायत्री आनंद गिरी, मंदिराचे पुजारी

२२ वर्षापूर्वी झाले होते बांधकाम.

आधी हे मंदिर २२ वर्षापूर्वी काळ्या पाषाणाच्या चबुतऱ्या कोरलेली देवीची मूर्ती होती. याच देवीच्या मुर्तीच्या बाजूलाच ऐतिहासिक बारव आहे. प्राचीन वारसा लाभलेल्या या मंदिराचा जिर्णोध्दार गावातील दुर्गादास जैस्वाल यांनी स्वखर्चाने केला होता. त्यात मंदिराचे बांधकाम , कळस आणि सभामंडपाचे काम केले होते. रस्ता आणि मजबुत सभामंडपासाठी मागणी करतो. लोकप्रतिनिधी येतात आणि आश्वासने देऊन जातात. प्रत्यक्षात विकास काही होत नाही.

- एकनाथ गिरी, पुजारी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com