Sambhajinagar : जलवाहिनीसाठी पंधरा कोटींचा कॉंक्रिटचा खोदला रस्ता

sambhajinagar
sambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडकोमध्ये मजीप्राच्या  नियोजनशून्य कारभाराचा मोठा फटका सिडको टी पाॅईंट-कामगार चौक हा सरकारी अनुदानातून दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला काँक्रिटचा रस्ता मजीप्रा नियुक्त कंत्राटदार जीव्हीने खोदला. यात जवळपास एक किलोमीटरच्या रस्त्याची दिड मीटर कडा खोदली जात आहे. यात ड्रेनेजलाईन, बीएसएनएलच्या व इतर खाजगी कंपनीच्या केबलचेही मोठे नुकसान केले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्याच्या कडेला तीन मीटरचा फुटपाथ सोडून रस्ता खोदला जात असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

sambhajinagar
Sambhajinagar : उच्च न्यायालयाचा मंत्री सत्तारांना दणका; काय आहे प्रकरण?

सिडकोतच नव्हे तर शहरभर छत्रपती संभाजीनगरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तसेच महानगरपालिकेच्या व कंत्राटदार जीव्हीपीआरच्या नियोजनशून्य कारभाराचा मोठा फटका बसत आहे. शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची वाट लावल्यानंतर आता सिडको टी पाॅईंट ते कामगार चौक  या प्रमुख रस्त्याला फटका बसला आहे. कारण हा रस्ता दोन वर्षांपूर्वीच जवळपास १५ कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आला होता. याच रस्त्याच्या शेजारी फुटपाथ खाली जुनी जलवाहिनी स्थलांतरित न केल्याने आता नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी तब्बल १५ कोटींचा रस्ता तोडण्याची वेळ आली आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी बनवलेला काँक्रिटचा रस्ता खोदण्याची वेळ आल्याने मजीप्राच्या नियोजनशून्य कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

sambhajinagar
Nashik ZP : डीपीसीने नाक दाबताच झेडपीचे उघडले तोंड; अखर्चित 7 कोटी सरकारकडे जमा

सिडको एन-२ व एन-३ मधून जाणाऱ्या या प्रमुख रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून झाले नव्हते. नक्षत्रवाडी जल शुद्धीकरण केंद्राकडून बीड बायपास, मुकुंदवाडी रेल्वे रुळाखालून ही १३०० मीटर व्यासाची जलवाहिनी जयभवानीनगर - कामगार चौक - सिडको जळगाव टी पाॅईंट ते हर्सुल टी पाॅईंटकडे नेली जात आहे. सिडको - हडकोसह हर्सुल परिसरातील पाणीपुरवठा करणारी मुख्य जुनी जलवाहिनी या रस्त्याच्या बाजूने गेली आहे. मात्र, नवीन जलवाहिनी टाकताना जुन्या जलवाहिनीचे स्थलांतर होणे आवश्यक असताना ही जलवाहिनी रस्त्याच्या मधोमध टाकली जात आहे. मुळात ही नवीन पाणीपुरवठा योजना ही २०१९ ला मंजुर झालेली आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना रुंदीकरण सुद्धा करण्यात आलेले आहे. ही जलवाहिनी रस्ता बांधण्याआधी जलवाहिनीचे काम करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता आता थेट जलवाहिनीसाठी नवा कोरा सिमेंटचा रस्ता खोदण्यात येत आहे. आता भविष्यात जलवाहिनीची दुरुस्ती करायची झाल्यास रस्ता पून्हा पून्हा तोडावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत जलवाहिनी अक्षरशः रस्त्याखाली गाडून टाकली जात आहे. त्यावेळी केलेले दुर्लक्ष हे आता मात्र महागात पडत आहे. कारण ही जलवाहिनी भविष्यात खराब झाली की तिच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधींचा खर्चून बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रिटचा रस्ता तोडण्याची वेळ आली आहे. भविष्यात हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com