मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी मिळणार मोठी भेट; बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त

‘अहिल्यानगर - बीड - परळी’ रेल्वे मार्गाचा आढावा; पुणे सेवेसाठी तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण, पनवेल सेवेसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना
‘अहिल्यानगर - बीड - परळी’ रेल्वे मार्ग
Nagar Beed Parali RailwayTendernama
Published on

मुंबई (Mumbai): बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड - पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर सुरू करण्याचे नियोजन आहे. या सेवेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच डिसेंबरअखेर बीड - मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

‘अहिल्यानगर - बीड - परळी’ रेल्वे मार्ग
गडचिरोलीसाठी गुड न्यूज! जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 80 कोटींची मान्यता

सह्याद्री अतिथीगृह येथे ‘अहिल्यानगर–बीड–परळी’ रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा तसेच ‘बीड–पुणे’ आणि ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात बैठक झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस रेल्वे आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, बीडसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला गती देणाऱ्या ‘बीड–पुणे’ आणि ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवेसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ‘अहिल्यानगर–बीड–परळी’ या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली.

गतवर्षी १७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ‘बीड–अहिल्यानगर’ रेल्वे सेवा सुरू झाली. आता यावर्षी त्याच ऐतिहासिक दिनी ‘बीड–पुणे’ रेल्वे सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.

‘अहिल्यानगर - बीड - परळी’ रेल्वे मार्ग
अजितदादांच्या कार्यकाळात मंजुरी मिळालेल्या बीडमधील 'त्या' प्रकल्पाबाबत सरकारने काय घेतला निर्णय?

‘बीड–पुणे’ रेल्वे सुरू झाल्यानंतर बीड जिल्ह्याची पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट रेल्वे जोडणी निर्माण होणार आहे. त्यामुळे कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक आणि व्यापार क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होण्यासही मदत होणार आहे.

१७ सप्टेंबर रोजी सेवा सुरू करण्यासाठी उर्वरित तांत्रिक, प्रशासकीय आणि सुरक्षाविषयक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. तसेच डिसेंबरअखेर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून आवश्यक कामांचा कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त होणाऱ्या ‘बीड–पुणे’ रेल्वे सेवेच्या शुभारंभ कार्यक्रमाची तयारी नियोजनबद्ध आणि समन्वयाने करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

‘बीड–पुणे’ आणि पुढे ‘बीड–मुंबई’ ही रेल्वे जोडणी बीडच्या विकासासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले. या रेल्वे सेवेमुळे बीडच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

‘अहिल्यानगर - बीड - परळी’ रेल्वे मार्ग
Sunetra Pawar: इंदापूरकरांना सरकारने काय दिली गुड न्यूज?

Key Points

  • बीड–पुणे रेल्वे सेवा १७ सप्टेंबरला सुरू करण्याचे नियोजन,

  • बीड–पुणे रेल्वेसाठी तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण,

  • डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याचे लक्ष्य,

  • उर्वरित कामांसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना,

  • बीडची पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट रेल्वे जोडणी होणार,

  • रेल्वे जोडणीमुळे कृषी, उद्योग, शिक्षण आणि व्यापाराला चालना मिळण्याची अपेक्षा.

Tendernama
www.tendernama.com