औरंगाबाद : सफारी पार्कच्या जागेवरील अतिक्रमण,वीज चोरीवर धडक कारवाई

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद स्मार्ट सिटीद्वारे विकसित करण्यात येणाऱ्या सफारी पार्कची पाहणी करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण व मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मिटमिटा येथे भेट दिली आणि प्रकल्पाच्या जागेवर केलेले अतिक्रमण, रेती उपसा व वीज चोरी वर कार्यवाही करण्यात आली. यावेळेस सफारी पार्कपर्यंत रस्त्यासाठी भूसंपादन करण्यासाठी मनपा नगररचना विभाग आणि स्मार्ट सिटीने संयुक्त प्रस्ताव सादर करावे, असे आदेश देण्यात आले.

Aurangabad
MMRDAला 'या' ठेकेदाराचा 24 कोटींना गंडा; 20 महिन्यात दमडीही नाही..

औरंगाबाद स्मार्ट सिटीने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी सफारी पार्क प्रकल्पाचे काम एप्रिल 2021 मध्ये सुरू झाले असून आता दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. 200 कोटी एवढ्या निधी लावून जागतिक दर्जाचे प्राणी संग्रहालय व सफारी पार्क बनवण्यात येत असून येथे दरवर्षी दहा लाख अभ्यागतांची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या पर्यटन मुल्यामध्ये वाढ व अर्थव्यवस्थेत सुधारणा अपेक्षित आहे.

Aurangabad
लोकशाहीची मशाल कायम तेवत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका उभारणार...

हा प्रकल्प लवकर आणि उच्च दर्जाचे विकसित करण्यात यावा यासाठी मनपा, स्मार्ट सिटी व राज्य सरकार प्रयासरत आहे. या अनुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण व मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पांडेय यांनी अन्य अधिकाऱ्यांसोबत प्रकल्पाच्या साईटची पाहणी केली. यावेळेस स्मार्ट सिटी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, शहर अभियंता सखाराम पानझडे, मनपा उपायुक्त व स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा थेटे, स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, नगर रचना उपसंचालक ए. बी. देशमुख, महावितरणचे अधिक्षण अभियंता, मनपा नगररचना उपअभियंता संजय कोंबडे जिल्हा खनिकर्म अधिकारी, छावणी पोलिसचे पीएसआय व अन्य उपस्थित होते.

Aurangabad
Khadki: जुन्या मुंबई-पुणे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नव्याने टेंडर

यावेळेस पाहणी करत असताना लक्षात आलेले अवैध रेती धुण्याचे प्रकार उघडकीस आले आणि याबाबत तत्काळ कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी व पोलिस विभागामार्फत या कार्यवाही अंतर्गत वापरण्यात आलेल्या जेसीबी (एक्सकैवेटर) व टिपर हे जप्त करण्यात आले व महावितरण तर्फे यासाठी करण्यात आलेली वीज चोरी बद्दल कार्यवाही केली. सोबतच प्रकल्पाच्या परिसरात करण्यात आलेल्या अतिक्रमण काढण्यासाठी मनपा अतिक्रमण विरोधी विभागचे प्रमुख व अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांना प्रशासकांनी निर्देश दिले. मुख्य रोडवरून सफारी पार्कला जाण्यासाठी रस्ते बांधण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादन करण्यासाठी प्रशासक यांनी स्मार्ट सिटी व मनपाच्या नगर रचना विभागाला संयुक्त प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाहीसाठी प्रशासकांमार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविण्याचे निर्देश दिले. यावेळेस प्रकल्पांतर्गत झालेल्या कामाची पाहणी करून काम दर्जेदार व लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com