Aurangabad: शंभर फुटी दमडी महल ते जालना रस्ता कधी होणार?

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : विकास आराखड्याच्या कागदावर दिसणारा चंपा चौक मार्गे दमडी महल ते जालना रोड या अडीच किलोमीटर लांबीच्या नियोजित रस्ता रुंदीकरणाबाबत 'टेंडरनामा' वाचा फोडली. सहकार मंत्री अतुल सावे यांनीही पाठपुरावा केला.

Aurangabad
Davos : महाराष्ट्र उद्योजकांच्या पसंतीस; 1 लाख 37000 कोटींचे करार

तत्कालीन मनपा प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांण्डेय यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत साडेचार कोटीचा निधी मंजूर केला. मात्र पहिल्या टप्प्यात दमडी महल ते चंपाचौक अतिक्रमणाला अभय देत काॅक्रिंट रस्ता तयार करण्यात आला. त्यातही रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथ, रस्त्याच्या मधोमध शहाबाजार नाल्यावरील पुलाचे काम न करता आज गुरूवारी (ता. १९) जानेवारी रोजी दुसऱ्या टप्प्यातील चंपाचौक ते रेगटीपूरा मार्गावरील व्यावसायिकांच्या टपऱ्या, शेड, ओटे काढायला सुरूवात केली. मात्र ५० वर्षाच्या जुन्या विकास आराखड्याप्रमाणे या रस्त्यांचे काम एकदाच पूर्ण करा, एकाचवेळी सर्वांचे अतिक्रमण काढा, यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होणार नाही.

या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी माजी नगरसेवक आरेफ हुसेनी, तसेच मनपाचे माजी विरोधी पक्षनेता फिरोजखान यांनी केली आहे.

Aurangabad
Nashik ZP : जलजीवनच्या योजनांचे हस्तांतरण आता सरपंचांऐवजी...

बकोरीयांचे धाडस; पण...

१९७०च्या औरंगाबाद शहर विकास आराखड्यातील हा ३० मीटर अर्थात शंभर फुटाचा रस्ता गत ५० वर्षापासून कागदावरच आहे. सहा वर्षापूर्वी तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी चंपा चौक मार्गे दमडी महल ते जालना रोड या अडीच किलोमीटर लांबीच्या नियोजित रस्ता रूंदीकरणाबाबत मोठे धाडस केले होते. मात्र महल जमीनदोस्त होण्याआधीच दोनशे वर्षाचा ऐतिहासिक ठेवा जतन करावा, यासाठी काही इतिहास प्रेमींना पुढे घालत बड्या अतिक्रमणधारकांनी पडद्यामागची भूमिका ठेवली. पण तरीही बकोरीयांनी कुठेही न डगमगता या रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या दोन इमारती काढून टाकल्या होत्या. नंतर गणेश काॅलनीकडून फाजलपुरा  व शहा बाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वळणावर असलेल्या दमडीमहल ते दर्ग्याजवळील नाल्यावरील वळण घेणारा एक २० मीटरच्या  पूलाचे  बांधण्यात करण्यात आले.  त्यानंतर दमडी महल पाडून रस्ता गणेश कॉलनीला जोडण्याचा बकोरीयांचा प्रयत्न मात्र बड्या अतिक्रमणधारकांनी हानून पाडला. त्यानंतर बकोरींची बदली झाल्यानंतर या रस्त्याचे काम थंडबस्त्यात अडकले.

सहकारमंत्र्यांचा पाठपुरावा

'टेंडरनामा' ने दमडीमहल ते जालनारस्ता, लक्ष्मणचावडी ते एमजीएम आणि सिडको जालनारोडपासून थेट बीडबायपासला जोडणाऱ्या रामनगर परिसरातील झेंडाचौक ते विश्रांतीनगर या जालना रस्त्याला पर्यायी असणाऱ्या अर्धवट रस्त्यांबाबत तसेच तत्कालीन मनपा आयुक्त डाॅ. पुरूषोत्तम भापकर यांच्या काळातील गुलमंडी, कबाडीपुरा, बुढ्ढीलेन, कासारीबाजार, केळीबाजार, भांडीबाजार, सब्जीमंडी, रेंगटीपुरा ते राजाबाजार , बांबूगल्ली आदी रखडलेल्या १७ रस्त्याच्या रूंदीकरणाबाबत विशेष वृत्तमालिका लावली. मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांच्यासह आमदार - खासदारांपासून माजी नगरसेवकांपर्यंत पाठपूरावा केला. यात सहकारमंत्री अतुल सावे यांनी प्रशासकांकडे पाठपुरावा केला होता.

कार

Aurangabad
Public transport पुणेकरांची अवस्था 'एक ना धड भाराभर..!' कारण...

कारवाई अर्धवट

यापैकी गुरूवारी १९ जानेवारी रोजी प्रशासकांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण हटाव प्रमुख रविंद्र निकम, पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवने, व्ही. आर. भोये यांच्या सहकार्यांने इमारत निरीक्षच पी.एस.गवळी, सय्यद जमशेद व इतर कर्मचाऱ्यांनी जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे  मनपा पथकाचे पोलिस निरीक्षक फइम हाश्मी यांच्या सुरक्षेत चंपाचौक ते रेंगटीपूरा पर्यंत अतिक्रमण काढून रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र रुंदीकरणाला बाधा ठरणाऱ्या बड्यांच्या इमारतींना धक्का न लावता गरिबांची दुकान शेड, टपऱ्या, ओटे पाडण्यात आले.

काय आहे नगरसेवकांची भूमिका

दरम्यान यावेळो माजी नगरसेवक आरेफ हुसेनी व माजी विरोधी पक्षनेता फिरोजखान यांनी दमडीमहल ते चंपाचौक ते थेट जालना रोड हा  मनपाच्या १९७० च्या  शहर विकास आराखड्यात आणि नंतर झालेल्या १९९१ च्या सुधारित आराखड्यात  ३० मीटरचा रस्ता प्रस्तावित केला आहे. हा रस्ता आकाशवानी , जालनारोडकडून कैलासनगर, जयभवानीनगर , रोहीदासनगर , जुनामोंढा, रेंगटीपुरा, निजामगंज, चंपाचौक , शहानगर , फाजलपुरा, दमडीमहल ते थेट गणेश काॅलनीला जुळतो. एकाचवेळी या रस्त्यातील बाधीत मालमत्ताधारकांना टीडीआर न देता रोख स्वरूपात मावेजा द्या आणि रस्त्याचे काम सुरू करा, अशी अपेक्षा त्यांनी मनपा अधिकाऱ्यांकडे केली.

Aurangabad
Nagpur: ठेका संपला, रोजी विसरा!१७ कामगारांना रोजंदारी देण्यास नकार

प्रत्यक्षात हा रस्ता रुंद करून जालना रोडला जोडणे हे मोठे आव्हान मनपा प्रशासनासमोर आहे. एक मिशन म्हणून मोहीम हाती घेतली तरच रस्ता होऊ शकतो. मात्र तत्कालीन मनपा आयुक्त बकोरीया यांनी गणेश काॅलनीपासून चंपा चौकापर्यंत हा रस्ता रुंद झालेला असला तरी पुढे जालना रोडपर्यंत या नियोजित रस्त्याच्या जागेवर तब्बल साडेचारशेवर बांधकामे आहेत. या इमारती काढल्या तर आज मनपा प्रशासनाला रेडिरेकनर दरानुसार ९०० कोटी रूपये लागतील. रस्ता रूदीकरण मोहीमेत सर्वांचे अतिक्रमण एकाचवेळी काढल्यास दमडी महल येथे वाय आकाराचा रस्ता तयार होऊन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच टीव्ही सेंटर येथून जालना रस्त्यावर येणे सुखकर होणार आहे, असा सल्ला माजी नगरसेवक आरेफ हुसेनी आणि मनपाचे माजी विरोधी पक्षनेता फिरोजखान देत असतानाच अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांनी दोघांना हात जोडत भाऊ मी तूम्हाला हात जोडतो पाया पडतो जे होतेय ते होऊ द्या, असे म्हणत काढता पाय घेतला.

Aurangabad
Nagpur: काम सुरू होण्यापूर्वीच बजेट ५० कोटींनी कसे काय वाढले?

औरंगाबादच्या विकासात भर घालणारा रस्ता

आज जिल्हाधिकारी कार्यालयापासून आकाशवाणीपर्यंत जायचे असेल तर दोन पर्याय आहेत. एक तर शहागंज, मोंढा आणि पुढे आकाशवाणी असे साडेतीन किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. दुचाकीस्वार चंपा चौकातून पुढे जाफर गेट येथून आकाशवाणीकडे जातात. त्यांना साधारण तीन किलोमीटर अंतर पार करावे लागते. मोठे वाहन असल्यास टीव्ही सेंटर, सेव्हन हिल असे वळण घेत आकाशवाणी येथे पोहोचता येते. त्यासाठी पाच ते सहा किलोमीटर अंतर पार करावे लागते, परंतु हा रस्ता झाला तर अडीच किलोमीटर अंतर सर्व वाहनांना पार करावे लागेल. यामुळे सर्वांचाच वेळ वाचेल. कारण पर्याय असलेल्या दोन्हीही रस्त्यांवर कमालीची वर्दळ असते. शिवाय जालना रस्त्याचा वाहतूकीचा भार देखील कमी होऊन औरंगाबादच्या विकासात भर पडेल.

सहाशे मालमत्तांचा अडथळा

२०१२ मध्ये तत्कालीन मनपा आयुक्त डाॅ. पुरुषोत्तम भापकर यांच्या काळात दमडी महल ते चंपा चौक ते जालना रोड या सुमारे अडीच किलोमीटरपर्यंत जवळपास सहाशे मालमत्ता या रस्त्यावर येतात. त्यामुळे जवळपास १० ते १२ एकर जागा मनपाला मोकळी करावी लागेल.

Aurangabad
Nagpur: गडकरींच्या शहरातील रस्त्यांवरचे खड्डे थेट न्यायालयात...

प्रशासक साहेब खास बाब म्हणून विचार करा

विकासआराखड्यात हा रस्ता दाखवण्यापूर्वीच म्हणजे १९९१ पूर्वीच येथे बांधकामे झाली होती. बांधकामे झाल्यानंतर हा रस्ता विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात आला. येथे कोणतेही लेआऊट नव्हते. अनेकांनी बाँडवर व्यवहार केले आहेत, तर अनेकांकडे कागदपत्रेच नाही. त्यामुळे येथील मालमत्ता पाडताना रहिवाशांना खास बाब म्हणून अन्यत्र भूखंड देण्याचा विचार करावा लागेल किंवा टीडीआर द्यावा लागेल (कैलासनगर तसेच किलेअर्क येथील मालमत्ताधारकांसाठी अनुक्रमे हर्सूल पडेगाव येथे भूखंड देण्यात आले). मात्र मनपाचा अनुभव पाहता येथील मालमता धारक रोख पैसा द्या तरच मालमत्ता पाडू असा आग्रह करत आहेत.

पंचायत समिती कार्यालयापासून या रस्त्याची सुरुवात होईल. दमडी महल त्यापुढे चंपाचौकातून थेट जालना रस्त्यालगत असलेले रेमंड शोरूम व मुळे डायग्नोस्टिक सेंटर या दोन इमारतींच्या मध्ये जालना रोडला मिळेल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com