Aurangabad: गतवैभव मिळाले; आता पर्यटकांचा ओघ वाढवा

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेतील टिळकनगरातील भारतमाता मंदिराची जीर्ण-शिर्ण अवस्था बदलून त्याचे रूपडे पालटले आहे. आकर्षक रंगरंगोटी, क्रांतिकारकांच्या प्रतिमांच्या फ्रेमदेखील नव्याकोऱ्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे छतावरील फायबरचा फुटका डोम देखील बदलण्यात आला आहे.

परिसरातील मोकळ्या पटांणाचे सुशोभिकरण करून दिवाबत्तीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. 'टेंडरनामा' वृत्तमालिका आणि सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महापालिका प्रशासनाने गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित मंदिराच्या देखभाल दुरुस्तीसाठी सकारात्मक प्रयत्न केल्याने आज केलेल्या पाहणीत मंदिराचे रुपडे पालटल्याचे पाहायला मिळाले.

Aurangabad
Nagpur : वेकोलित सुरु आहे ओव्हरलोड  कोळसा वाहतूक

इतकाच सकारात्मक दृष्टीकोन महापालिकेने पर्यटक वाढीकडे ठेवल्यास आणि पर्यटकांचा ओघ वाढल्यास शहराच्या लौकिकात भर पडू शकते. भारतमातेचे दर्शन आणि शौर्य गाजवणाऱ्या क्रांतीकारकांची माहिती संकलीत करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले, तर मंदिराचा दैनंदिन आणि देखभाल दुरूस्तीचा खर्च देखील वसूल होऊ शकतो. यासोबतच आता याच परिसरातील काव्य बाग आणि लोककला उद्यानाकडे कारभाऱ्यांनी इतक्याच तत्परतेने लक्ष देणे गरजेचे आहे.

देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी अतुलनीय शौर्य गाजवलेल्या क्रांतिकारकांची स्मृती जपण्यासाठी औरंगाबादेतील टिळकनगरात भारतमातेच्या मंदिर या प्रकल्पाची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र एकदा प्रकल्प उभारला की, त्याकडे नंतर वर्षानुवर्षे दुर्लक्ष करायचे अशी महापालिका कारभाऱ्यांची गावभर ख्याती आहे. यामुळेच भारतमाता मंदिर ही उत्तम वास्तू, देशभक्तांच्या प्रतिमा, आणि दैदिप्यमान लढा चितारलेले हे देखणे स्मृतीस्थळाची अत्यंत वाईट अवस्था झाली होती.

Aurangabad
NHAI: 'या' 4 जिल्ह्यांतील 122 गावांतील जमिनीला येणार सोन्याचा भाव

'टेंडरनामा'ने याच भागातील कवितेची बाग, लोककला उद्यान सोबतच भारतमाता मंदिराबाबत मुद्दे उपस्थित करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर भारतमाता मंदिराचे रुपडे पालटले. आता इतकाच सकारात्मक दृष्टीकोन कवितेची बाग, लोककला उद्यानाच्या दुरुस्तीकडे महापालिका कारभाऱ्यांनी ठेवावा. भारतमाता मंदिरासह या उद्यानांकडे पर्यटकांचा ओघ कसा वाढेल, यासाठी त्यांचे ब्रॅंडिग करावी, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रयत्न केल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल व शहराच्या लौकिकात भर पडेल,असेही त्यांचे मत आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांनी अतुलनीय शौर्य गाजवले होते. क्रांतिकारकांचा लढा १८५७ ते १९४७ या काळात अव्याहतपणे सुरू होता. या प्रेरणादायी लढ्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी टिळकनगरातील गुरूकुंच हाऊसिंग सोसायटीच्या खुल्या जागेवर भव्य असे भारतमाता मंदिर साकारण्यात आले. 

Aurangabad
Nashik : महापालिकेत लवकरच होणार 3500 पदांची भरती

सशस्त्र क्रांतीतून इंग्रजांना नामोहरम करणाऱ्या शंभर क्रांतिकारकांची सचित्र माहिती येथे उपलब्ध आहे. तत्कालिन नगरसेवक तथा उपमहापौर संजय जोशी यांच्या संकल्पनेतून भारतमाता मंदिर उभारण्यात आले. मंदिराच्या दर्शनी भागातील भारतमातेची मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार मडिलगेकर बंधू यांनी तयार केली आहे. तर ‘स्टुडिओ दर्पण’ने क्रांतीकारकांच्या प्रतिमांची मांडणी व सजावट केली.

या भव्य वास्तुतील प्रतिमांची सूत्रबद्ध मांडणी भेट देणाऱ्यास खिळवून ठेवतात. तर क्रांतिकारकांच्या कार्याची सचित्र माहिती विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणारी आहे. या वास्तूचे महत्त्व लक्षात घेऊन शहरातील शाळांच्या सहली भारतमाता मंदिराला भेट देण्यासाठी येत असत. क्रांतिकारकांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेतलेले हे ठिकाण आकर्षणाचा विषय ठरले आहे. सनावळींसह वस्तुनिष्ठ माहिती सुरेश हिरे यांनी उपलब्ध केली.

२६ डिसेंबर १९९९ रोजी भारतमाता मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. पाठ्यपुस्तकातील मोजकेच क्रांतीकारक सर्वांना माहीत आहेत. तर स्वातंत्र्यलढ्यातील अनेक दुर्लक्षित क्रांतिकारकांना प्रकाशझोतात आणण्याचे महत्त्वाचे काम या माध्यमातून झाले. स्वातंत्र्यलढ्याच्या अग्रणी राणी चन्नम्मा यांच्या कामापासून प्रतिमा मांडणी केली आहे. कालावधीनुसार क्रांतिकारकांचा पट मांडण्यात आला आहे.

राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, मंगल पांडे, खुदीराम बोस, खुशीराम, बाळकृष्ण चाफेकर, भगतसिंग यांच्यासह संगोली रापण्णा, ठाकूर बिसेरसिंग, जयदयाल भटनागर, मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कर्तारसिंग, डॉ. माथूरसिंग अशा अपरिचित क्रांतिकारकांची सविस्तर माहिती भारतमाता मंदिरात उपलब्ध आहे. नेमके हेच वैशिष्ट्य नागरिकांसाठी आकर्षणबिंदू ठरले होते. मात्र नेहमीप्रमाणे निधी नसल्याचे म्हणत वर्षभराचा गाजावाजा करत महापालिकेने देखभाल दुरूस्तीसाठी कानाडोळा केला होता. यावर 'टेंडरनामा'ने मुद्दा उपस्थित करताच महापालिकेने उत्तमरित्या दुरूस्ती केल्याने या प्रकल्पाला गतवैभव प्राप्त झाले आहे.

Aurangabad
Bullet Train : बुलेट ट्रेनच्या महाराष्ट्रातील स्टेशन्सला युनिक लूक

शहरात वर्षभरात देश-विदेशातील लाखो पर्यटक येतात. त्यांना या पर्यटनस्थळाकडे वळवण्यात अजूनही महापालिकेला पुरेसे यश मिळालेले नाही. याची माहिती पर्यटकांना मिळाल्यास शहराच्या लौकिकात भर पडू शकते. पर्यटकांना भारतमाता मंदिरापर्यंत आणण्यात प्रशासन आणि पर्यटन व्यावसायिक कमी पडले आहेत. त्यामुळे हे निःशुल्क असलेले देखणे पर्यटनस्थळ उपेक्षित ठरले आहे.

प्रचाराचा अभाव

भारतमाता मंदिरात काही वर्षांपूर्वी पर्यटकांचा ओघ होता; मात्र त्यातील सातत्य टिकले नाही. प्रचार केल्यास  शहरातीलच नव्हे, तर देशविदेशातील पर्यटक आणि औरंगाबाद जिल्ह्यासह  राज्यातील कानाकोपर्यातील शाळांचे विद्यार्थी भारतमाता मंदिरात येऊ लागतील. परिणामी  पर्यटकांसह विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महापालिका तसेच शहरातील राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाने यासाठी संयुक्त बैठक घेऊन प्रचाराचे काम हाती घेणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com