रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत खुले चर्चासत्र; मंत्री चव्हाण देणार उत्तरे

Ravindra Chavan.
Ravindra Chavan.Tendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी २७ ऑगस्टला डोंबिवली (मुंबई) येथे खुल्या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. त्यामुळे या महामार्गासंदर्भात आपले मत मांडण्याची संधी मुंबईतील चाकरमान्यांना उपलब्ध झाली आहे. या निमित्ताने कोकणातील रखडलेल्या या प्रश्नावर मुंबईत आवाज उठवला जाणार आहे.

Ravindra Chavan.
...अन्यथा LICच्या 68 धोकादायक इमारतींचा पुनर्विकास म्हाडा करणार

सार्वजनिक बांधकामंत्री चव्हाण यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात विशेष लक्ष घातले आहे. मंत्री झाल्यापासून त्यांनी आठवेळा या रस्त्याची पाहणी करून ठेकेदारांना सूचना केल्या. त्यामुळे महामार्गाच्या कामाला गती आली. गणेशोत्सवापूर्वी एकेरी मार्ग सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे; परंतु गेली अनेक वर्षे रखडलेल्या या कामाबाबत स्थानिक नागरिकांसह मुंबईतील चाकरमान्यांमध्येही नाराजी आहे.

Ravindra Chavan.
Mumbai-Goa महामार्गाबाबत मंत्री रविंद्र चव्हाण यांचे भावनिक पत्र, वाचा काय म्हणाले...

आगामी काळ हा निवडणुकीचा आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील चाकरमानी याच महामार्गाने कोकणात दाखल होणार आहेत. त्यांच्या मनातील मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत काही मुद्दे असतील तर ते समजून घेऊन त्यांचे निरसन करण्यासाठी मंत्री चव्हाण यांनी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यातून सध्या सुरू असलेल्या कामाला अधिक गती देण्याचा प्रयत्न मंत्री चव्हाण करणार आहेत. डोंबिवली जिमखाना, पेंढारकर कॉलेजसमोर २७ ऑगस्टला सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे चर्चासत्र चालणार आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com