सांबरकुंड वन जमीन हस्तांतरणांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू; फडणवीसांची माहिती

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

नागपूर (Nagpur) : कोकणातील सांबरकुंड वन जमीन हस्तांतरणांसाठी केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी प्रतिक्षेत असून पाठपुरावा सुरू आहे. त्यास अंतिम मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाचे बांधकाम हाती घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषदेत सांगितले.

Devendra Fadnavis
Nana Patole : विखे पाटील साहेब, 'त्या' कंपनीकडून होणारी नागरिकांची लूट थांबवणार की नाही?

रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांवर पाणी योजना राबवण्याबाबत सदस्य जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केले होते, त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, बाळगंगा प्रकल्पाच्या धरणाचे काम भौतिकदृष्ट्या 80 टक्के झाले आहे. सदर प्रकल्पाद्वारे सिडको नवी मुंबई क्षेत्रास पाणीपुरवठा करणे प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या वाढीव खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे.

Devendra Fadnavis
Uday Samant : परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; रायगड जिल्ह्यात 35 हजार कोटींची गुंतवणूक

सिडकोने प्रकल्पाचा उर्वरीत खर्च शासनामार्फत करणेविषयी सूचित केले आहे. तरी सदर प्रकल्पाच्या प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजूरी देण्याची कार्यवाही शासनस्तरावर प्रगतीपथावर असून मंजूरीनंतर निधी उपलब्धतेनुसार प्रकल्पाची पुढील कामे पूर्ण करणेचे नियोजन आहे. रायगड जिल्ह्याचा शाश्वत विकास घडवताना बाळगंगा हेटवणे, सांबरकुंड, काळकुंभे, आंबोली हे  प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी सदस्य अनिकेत तटकरे, आमश्या पाडवी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com