अबब! 12 वर्षात 15000 कोटी खर्च; तरीही मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेच खड्डे

Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa HighwayTendernama

मुंबई (Mumbai) : मनसेने मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांविरोधात रणशिंग फुंकले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील हातिवले टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. तसेच रत्नागिरीतील पाली खानू मधील हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे कार्यालय देखील मनसेने फोडले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवर मनसे आक्रमक झाली आहे.

Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa HighwayTendernama
Mumbai-Goa Highway
Eknath Shinde : महाराष्ट्राचा जीडीपीत 15 टक्के वाटा; 30 टक्के विदेशी गुंतवणूक

मनसेच्या पनवेलमधील निर्धार मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. या मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. या महामार्गावर कुठे आणि किती खड्डे पडलेत याची माहितीही त्यांनी घेतली. तेव्हापासून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa HighwayTendernama
Mumbai-Goa Highway
Narendra Modi : पंतप्रधान मोदी लवकरच येणार पुणे दौऱ्यावर? 'हे' आहे कारण...

रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. माणगावमधील चेतक सन्नी कंपनीचे कार्यालय फोडले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील हातिवले टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी मनसेचे राजापुर तालुका अध्यक्ष पंकज पंगेरकर आणि उपतालूका अध्यक्ष जयेंद्र कोठारकर यांना अटक केली आहे. रत्नागिरीतील पाली खानू मधील हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे ऑफीस देखील मनसेने फोडले आहे. गेल्या दहा वर्षांत मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांमध्ये अडीच हजार नागरिकांचा जीव गेला आहे. आतापर्यंत बांधकामावर साडेपंधरा हजार कोटी खर्च झाले आहेत. तरीही मुंबई-गोवा महामार्ग अजूनही अपूर्ण आहे, अशी टीका राज ठाकरेंनी पनवेलच्या मेळाव्यात केली.

Mumbai-Goa Highway
Mumbai : महापालिकेच्या स्ट्रीट फर्निचर खरेदीची दक्षता विभागाकडून चौकशी

मराठमोळा अभिनेता हेमंत ढोमेने देखील मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याबाबत समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर केली आहे. हेमंतने मुंबई- गोवा महामार्गावरील रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांचे हटके कॅप्शन देऊन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देत त्याने लिहिलं की, 'चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो! आता आपल्या रागाचं रूपांतर स्वतःचीच थट्टा करण्यात होत चाललं आहे!! भीषण!". या पोस्टमधुन त्याने मार्मिकपणे सरकारला टोला लगावला आहे. हेमंतची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या ट्विटवर काहींनी त्यांच्या भागातील रस्त्यांच्या खड्ड्यांचे फोटो शेयर केले आहेत. तर काहींनी त्याला पाठिंबा देत सरकारवर टिका केली आहे.

Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa Highway होईना अन् कोकणात आणखी एक मेगा एक्स्प्रेसवेची अधिसूचना

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली बारा वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गावरील रस्त्याची अवस्था आणि त्यावरील खड्डे याची वारंवार चर्चा होत असते. या मार्गावरुन प्रवास करणारे नागरिक या रस्त्याच्या अवस्थेबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करत असतात. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे देखील पाहायला मिळते. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुढे येतो. मग आंदोलने सुरू होतात, पाहणी दौरे होतात, आश्वासने दिली जातात. दीड दशक उलटले पण यात फरक पडलेला नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com