Bhandara
Bhandara Tendernama
विदर्भ

Bhandara : वैनगंगा नदीवरील पुलाच्या उद्घाटनासाठी का झाले आंदोलन?

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : वैनगंगा नदीवरील अंभोरा येथील पूल मागील एक वर्षांपासून बनून तयार आहे. बांधकाम पूर्ण झाले असताना सुद्धा, पूल रहदारी साठी अजून पर्यंत सुरू झाला नाही. एका तीरावरून दुसऱ्या तीरावर भंडारा आणि नागपुर जिल्ह्यात जाण्यासाठी नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. 1 मे रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले यांनी वैनगंगा नदीवरील अंभोरा येथील पुलाचे उद्घाटन करुन पायी व दोनचाकी वाहनासाठी खुला करण्याचे ठरविले. तशी सूचना दहा दिवस अगोदर प्रशासनास दिली होती. शेकडोच्या संख्येत परिसरातील नागरिक आंभोरा येथील वैनगंगा नदीवरील पूल सुरू करण्याच्या मागणीसाठी एकत्र आले. यावेळी प्रशासनासोबत संघर्ष झाला. शेकडो आंदोलकांना पोलिसांनी अटक करून अड्याळ पोलिस स्टेशन येथे नेले.

आंभोरा येथील 167 कोटी खर्च करून पुलाचे बांधकाम एक वर्ष अगोदर पूर्ण झाले. असून निव्वळ मोठ्या नेत्यांच्या तारखा मिळत नसल्याने व आगामी निवडणुकांमध्ये पुलाच्या उद्घाटनाचे श्रेय घेण्यासाठीच ह्या पुलाच्या उद्घाटनाला दिरंगाई करण्यात येत आहे. या कारणानेच पूल अजूनही बंद ठेवला असल्याचा आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे. आंदोलनकर्ते सुभाष आजबले यांनी सांगितले की, आम्ही मागील एक वर्षापासून रहदारी सुरू करण्यासाठी  बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा करीत आहोत. परंतु अभियंत्यांनी आम्हाला पुलाच्या तांत्रिकबाबीची अडचण सांगून. तसेच लावलेले, ज्याच्या भरोशावर पूल उभा आहे, त्या केबलचे तांत्रिक परीक्षण हे भारतात होत नसून परदेशात ऑस्ट्रिया या देशात होते. त्यासाठी ऑस्ट्रिया येथे जाण्यासाठी आम्हाला दोन इंजिनियर पाठवायचे आहेत. दोन्ही इंजिनिअर परदेशात गेल्यानंतर ह्या केबल टेस्टिंगचे काम पूर्ण करतील.  इंजिनीयरला ऑस्ट्रिया येथे विदेशवारी दौरा करण्यासाठी शासनाने विजा व पासपोर्ट दिलेला  नाही. त्यांच्या दौऱ्याला अजून पर्यंत परवानगी दिली नाही. त्यामुळे रोपवेचे टेस्टिंग न झाल्यामुळे दिरंगाई झाली. असे बांधकाम विभागाच्या घटनास्थळी उपस्थित अभियंत्यांनी सांगितले. यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले.

आंदोलक कोणत्याही परिस्थितीत  रस्ता चालू करण्यावर ठाम होते. यावेळी पोलिसांच्या प्रचंड मोठा ताफा मागविण्यात आला. आंदोलन स्थळी आंदोलकांचे वरिष्ठ अभियंता सोबत बोलणे झाले वरिष्ठ अभियान त्यांनी सांगितले की आम्ही या विषयावर एक बैठकीचे आयोजन दोन दिवसात करू, परंतु आंदोलकांचे यावर समाधान झाले नाही आंदोलन रस्ता चालू करण्याच्या मागणीवर ठाम होते. यावेळी शासनाच्या व बांधकाम विभागाच्या विरोधात मोठ मोठ्याने घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. शेवटी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक करून अड्याळ पोलीस स्टेशन येथे नेले. आंदोलनात सहभागी झाल्यामुळे सुभाष आजबले, पुजा ठवकर, जिल्हा परिषद सदस्य अनिता भुरे, प्रमिला शहारे,पंचायत समिती सदस्य काजल चवळे समेत अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.