Narendra Modi
Narendra Modi Tendernama
विदर्भ

Nagpur: मोदींनी का पुढे ढकलला उद्घाटनाचा मुहूर्त?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : दीक्षाभूमीपासून (Diksha Bhoomi) जवळच 15 किमी अंतरावरील चिचोली येथील शांतिवन (Shantivan, Chicholi) येथील 'बुद्धिस्ट सेमिनरी', 'बौद्ध प्रशिक्षण विद्यालय', 'शांतिविहार', 'शांती मुद्रणालय' आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तूंच्या स्मृतिसंग्रहालयचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. मात्र ते सहा महिने पुढे ढकलण्यात आले आहे. तसेच, या ठिकाणचे बांधकाम साडेसात कोटीतून त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले असल्याचे सांगण्यात आले.

केंद्र शासनाच्या डॉ. आंबेडकर फाउंडेशनतर्फे 2016 मध्ये 17 कोटीचा निधी शांतीवनाला मिळाला. यातून उभारण्यात आलेली इमारत पूर्ण झाली. तर महाराष्ट्र शासनाने 40 कोटीच्या

निधीतून चिचोलीमधील विविध इमारतीचे बांधकाम सुरू आहे. आंबेडकर ट्रेनिंग सेंटरची नवीन इमारतीही तयार करण्यात आली आहे. या वास्तूंसोबत नवीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइनरित्या होणार होते.

जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी तयारीचा आढावा घेतला. मात्र अचानक पंतप्रधान कार्यालयातून सर्वच इमारतींचे एकाचवेळी उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आला. यामुळे शांतिवन चिंचोलीत राज्य सरकारच्या निधीतून नवीन संग्रहालय, सभागृह, गेस्ट हाऊस, धम्म प्रचारक ट्रेनिंग सेंटर, वसतिगृह, मेडिटेशन सेंटर, आनापानसती सेंटर, उपासक गृह आदीची काही कामे करण्यासाठी साडेसात कोटीचा निधी कमी पडला आहे. यामुळे हा निधी तत्काळ देण्यात यावा. जेणेकरून सहा महिन्यात शांतीवनाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते करता येऊ शकेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून देत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचे भारतीय बौद्ध परिषदेच्या संजय पाटील यांनी सांगितले.