Bridge
Bridge Tendernama
विदर्भ

Nagpur: अखेर PWDला जाग आली; वेणा नदीच्या पुरातन पुलावर...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : रायपूर व हिंगणा शहराला जोडणाऱ्या वेणा नदीवरील 60 वर्षांपूर्वीच्या पुलाची जीर्णावस्था झाली आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी रेटली होती.

या पुलावर तातडीने वेरिंग कोट मारण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष पुंड यांनी दिला होता. याची तातडीने दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने नदीवरील पुलाची दुरुस्ती करून वेरिंग कोट मारण्यात आला. यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली.

हिंगणा शहरातील 60 वर्षांपूर्वी वेणा नदीवर पूल बांधण्यात आला. अनेक वर्षानंतर या पुलावरील लोखंडी सळाखी उघड्या पडल्या आहेत. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी रेटण्यात आली. याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली. हिंगणा व रायपूर शहराला जोडणारी वेणा नदी आहे. या नदीवर 60 वर्षांपूर्वी पहिला पूल उभारण्यात आला. यानंतर बरीच वर्षे याच पुलावरून जड वाहतूक सुरू होती. कालांतराने दुसरा पूलही  2007 मध्ये बांधण्यात आला.

आता जुन्या पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलावरील लोखंडी सळाखी पूर्णता दिसू लागल्या आहेत. पुलावर ठिकठिकाणी भगदाडे पडली आहेत. पुलाची दुरवस्था झाली असतानाही या पुलावरून अद्यापही वाहतुकीची वर्दळ सुरू आहे. यामुळे एखादी मोठी अपघाताची घटना घडण्याची शक्यता आहे.

या पुलाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने जनतेचा जीव धोक्यात आला आहे. या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा पुलावर चक्का जाम आंदोलन  करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष पुंड यांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

याबाबतचीही बातमी प्रकाशित करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेत रविवारी पुलावर दुरुस्तीचे काम सुरू केले. पुलावर वेरिंग कोट मारण्यात आला. यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. यामुळे आता वाहनधारकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.