Coal
Coal Tendernama
विदर्भ

Nagpur: ठेका संपला, रोजी विसरा!१७ कामगारांना रोजंदारी देण्यास नकार

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : सिल्लेवाडा रोप-वे लाईनने कोळसा पुरवठा करण्यात येणाऱ्या रोप-वे लाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या कोळसा (Coal) हाताळणीच्या कंत्राटाची (Contract) मुदत संपल्याने ठेकेदाराने (Contractor) या कामासाठी ठेवलेल्या १७ कामगारांना त्यांची रोजंदारी देण्यास नकार दिला आहे.

कंत्राटी कामगार रोजीसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे दररोज उंबरठे झिजवित आहेत. मात्र संबंधित अधिकारी काहीही ऐकूण घेण्यास तयार नाही. तुम्हाला ज्या ठेकेदाराने कामावर ठेवले त्याच्याकडे रोजी मागा, असे सांगून कामगारांना परतावून लावत आहेत.

सिल्लेवाडा कोळसा खाणीतून खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला रोप-वे लाईन बकेटने कोळसा पुरवठा करण्यात येतो रोप-वे लाईन देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी स्थानिक वीज केंद्र प्रशासनाची आहे. त्यामुळे कोळसा हाताळणी विभाग एकच्या माध्यमातून दरवर्षी टेंडर काढले जाते. रोप-वे लाईन देखभाल दुरुस्ती करण्यासाठी सिल्लेवाडा रोप-वे पॉईन्ट परिसरात जवळपास ३२ वर्षांपासून एका सुपरवायझर सह १६ कंत्राटी कामगार कार्यरत आहेत.

सदर कंत्राट मे ओरियन इंडस्ट्रीज या कंपनीला देण्यात आले होते. मात्र त्याची मुदत २७ नोव्हेंबर २०२२ रोजी संपली. त्यामुळे सिल्लेवाडा रोप-वे पॉईंट परिसरात असलेले १७ कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे.

खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात सिल्लेवाडा कोळसा खाणीतून शेकडो टन कोळसा रोप-वे लाईन ने आणला जातो. रोप-वे लाईनचे अलायमेंट, तुटलेले रोप-वे जोडण्या करीता कटिंग वेल्डिंग, ट्रे हॉलेज चैन, पास टेकल, हायड्रोलीक सिलेंडर दुरुस्ती, कॉम्प्रेशर वर्क्स आदि कामांची देखभाल दुरुस्ती केल्या जाते.