Samruddhi Mahamarg Tendernama
विदर्भ

'या' जिल्ह्यात 142 किमीच्या महामार्गाने येणार 'समृद्धी'

टेंडरनामा ब्युरो

गडचिरोली (Gadchiroli) : राज्याची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूरपर्यंत 600 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता भंडारा ते गडचिरोली या दुसऱ्या टप्यातील समृद्धी महामार्गाच्या अंतिम आखणीला मान्यता प्रदान करण्यात आली असून, राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या महामार्गाचे काम केले जाणार आहे. रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, सुरजागड लोहप्रकल्प व आता समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून जिल्हा विकासाकडे गतीने झेपावत आहे.

शेवटच्या टोकावरील मागास गडचिरोली आतापर्यंत उद्योगविरहित जिल्हा म्हणून परिचित होता. पण आता मोठमोठे प्रकल्प येत आहेत. राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 600 किमीमध्ये लांबीच्या अंतरात पूर्ण झाला असून, वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. उर्वरित लांबीचा महामार्गही लवकरच वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या पूर्व व पश्चिम सीमा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गनि जोडण्याच्या दृष्टीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार नागपूरपासून भंडारा ते गडचिरोलीपर्यंत करण्याचे नियोजन होते. 

राज्याच्या पूर्व विभागातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूरपर्यंत समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे. या द्रुतगती महामार्गाचा विकास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 27 डिसेंबर 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

दळणवळण व पर्यटन विकासाला मिळणार चालना :

नागपूर, भंडारा ते गडचिरोली अशा समृद्धी महामागनि गडचिरोली जिल्ह्यात दळणवळण व पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. हा मार्ग करण्याचा मुख्य उद्देश नागपूर शहराला गडचिरोली, भंडारा आणि पुढे मुंबईशी प्रदेश राज्याचा नियंत्रित द्रुतगती महामागनि जोडणे हा आहे. उत्तर आणि ईशान्येकडील मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांशी ठाकरे द्रुतगती महामार्गाद्वारे आंतरराज्यीय संपर्क स्थापित करणे हा आहे.