Eknath Shinde
Eknath Shinde Tendernama
विदर्भ

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी दिली गुड न्यूज! 'या' योजनेतून 3 वर्षांत देणार 10 लाख घरे

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : राज्यातील इतर मागास प्रवर्गासाठी (OBC) जिल्हानिहाय 72 पैकी 52 वसतीगृहे महिनाभरात सुरू होत आहेत. प्रति जिल्हा 100 मुली व 100 मुले असे 7200 मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यातील इतर मागास प्रवर्गासाठी पीएम आवास (PM Awas) घरकुल योजनेंतर्गत 10 लाख घरे 3 वर्षांत बांधण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

धनगर समाजासाठी 10 हजार घरकुले बांधतो आहोत. 2 हजार 888 लाभार्थ्यांना लाभ दिला आहे. धनगर समाजाच्या उन्नतीकरीता राबविण्यात येणाऱ्या योजनांचे संनियंत्रण करण्यासाठी शक्तीप्रदत्त समिती स्थापन झाली आहे. धनगर बहुल जिल्ह्यांमध्ये धनगर समाजातील मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहे उभारण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.