Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Tendernama
विदर्भ

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली Good News! आता कंत्राटी कामगारांना देणार...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : हरियाना सरकारप्रमाणे महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार देण्यासाठी हरियाना कौशल्य विकास बोर्डाप्रमाणे नवीन यंत्रणा उभारणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भारतीय मजदूर संघाच्या बैठकीत सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेमुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कंत्राटी कामगारांना पारेषण व वितरण भरतीमध्ये आरक्षण व वयात सवलत मिळावी, आयटीआय नसलेले कुशल व अनुभवी कमी केलेल्या कामगारांना परत कामावर घ्यावे, कोर्ट केसेसच्या कामगारांना परत कामावर घेण्याच्या सूचना फडणवीस यांनी यावेळी आभा शुक्ला यांना दिल्या. 

राज्यातील कंत्राटदारांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली असता प्रधान सचिव यांनी वीज कंत्राटी कामगार संघाच्या सर्व समस्यांसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेण्याची सूचना दिली. लवकरच यावर काम केले जाईल असे ही आश्वासन दिले.

सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय मजदूर संघाशी संलग्न विविध संघटनांचे प्रमुख यांची फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. बैठकीत कामगार मंत्री सुरेश खाडे, श्रीकर परदेशी, प्रधान सचिव (कामगार) विनिता वेद सिंघल, प्रधान सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला तिन्ही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी आदी उपस्थित होते.