Coal
Coal Tendernama
विदर्भ

Nagpur: बंद कोळसा खाणी होणार लवकरच सुरू; 'या' कंपनीसोबत झाला करार 

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मध्य भारतातील अनेक कोळसा खाणी 20 वर्षांपूर्वी बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने (वेकोलि) देशाची कोळशाची गरज लक्षात घेता पुन्हा बंद खाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या खाणी महसूल वाटप तत्त्वावर देणे सुरू केले आहे. आधी वलनी खाण व आता एबी इनलाईन भूमिगत खाणीबाबतचा करार करण्यात आला.

वेकोलिने या करारानुसार वलनी खाणीचे काम आधी वेन्सार कन्स्ट्रक्शन लि. या कंपनीला दिले होते. त्यातून उत्पादनही सुरू झाले.  एबी इनलाईन भूमिगत खाणीची जबाबदारी श्री अमरनाथ मिनरल प्रा. लि. ला दिली गेली. वलनी खाणीतून येत्या 20 ते 25 वर्षांत 6.05 मिलियन टन कोळसा तर एबी इनलाईन खाणीतून 6. 55 मिलियन टन कोळशाचे उत्पादन केले जाणार वेकोलिने श्री अमरनाथ मिनरल प्रा. लि. कंपनीला लेटर ऑफ अवार्ड दिले. याप्रसंगी वेकोलिचे अध्यक्ष व सहव्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार, श्री अमरनाथ मिनरल प्रा. लि.चे शैलेंद्र कैलाशचंद्र अग्रवाल, नरेंद्र सिंग, वि भूपिंदर सिंग कोहली तर वेकोलिकडून तांत्रिक ( नियोजन व प्रकल्प) संचालक या ब ए. के. सिंग, तरुण कुमार श्रीवास्तव, खाण ए. पी. सिंग, संजय भट उपस्थित होते.

या बंद झालेल्या व परवडत नसलेल्या खाणींचा वेकोलिकडून कोणताही वापर होत नव्हता. परंतु, या नवीन पद्धतीने एकीकडे वेकोलिला उत्पन्न मिळेल दुसरीकडे स्थानिकांना खाणीत रोजगारही मिळणार आहे.