Eknath Shinde
Eknath Shinde Tendernama
विदर्भ

Nagpur : श्रीराम गडमंदिराचा होणार जीर्णोद्धार; मुख्यमंत्री देणार विकासनिधी

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (रामटेक) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार रात्री येथील गडमंदिराला भेट दिली व प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. गड मंदिराच्या विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

गोंदिया आणि नागपूर जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गड मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रीराम मंदिरात पूजा करण्यात आली. त्यांनतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिराविषयीची माहिती त्यांना देण्यात आली. गड मंदिराच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यासाठी पाठपुरावा करावा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

खासदार कृपाल तुमाने,आमदार ॲड.आशिष जायस्वाल, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत आदी यावेळी उपस्थित होते. रामटेक येथे प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या टेकडीवर श्रीराम मंदिर उभारण्यात आले असून गडमंदिर अशी मंदिराची ओळख आहे.

तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा केला विकासाचा संकल्प : 

प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र रामटेक भूमीमध्ये दरवर्षी 22 जानेवारीला रामटेक महोत्सव राज्य सरकारमार्फत घेण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तर प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा 200 कोटींचा विकास आराखडा सुद्धा मंजूर केला. हा निधी डिपॉजिट म्हणून ठेवला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. रामटेकला आयोजित महासंस्कृति महोत्सवात केली होती.