Mantralaya
Mantralaya Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : राष्ट्रवादीच्या सत्तेत सहभागानंतर येवल्यासह जळगावमधील 32 कोटींची स्थगिती उठली

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : राज्यात मागील वर्षी सत्तांतर झाल्यानंतर जुलैमध्ये त्यापुर्वीच्या मंजूर केलेल्या सर्व कामांना स्थगिती दिली होती. त्यानंतर जवळपास वर्षभराने महाविकास आघाडीमधील (MVA) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) एक गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आता महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने उत्तर महाराष्ट्रातील येवला, अमळनेर व पारोळा या तालुक्यांमधील ३२ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवली आहे.

या तीन मतदारसंघात येवला व अमळनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार असून पारोळ्यात शिवसेनेचे आमदार आहेत. या निर्णयामुळे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील २० कोटी ८२ लक्ष रुपयांच्या ३३ सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यांच्या कामांवरील स्थगिती उठविण्यात आली आहे.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने येवला, पारोळा व अमळनेर या मतदारसंघाच्या आमदारांच्या शिफारशीनुसार शून्य ते शंभर हेक्टर क्षमतेच्या बंधाऱ्यांच्या कामांना ९ मे २०२२ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यात येवला तालुक्यातील ३३ गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यासाठी एकूण २० कोटी ८२ लक्ष रुपयांच्या कामांचा समावेश होता. त्याच दिवशी अमळनेर व पारोळा तालुक्यातील ११ कोटी ७७ लाख रुपयांच्या १६ बंधाऱ्यांच्या कामांनाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

दरम्यान, त्यानंतर पुढच्याच महिन्यात नाट्यमय घडामोडी होऊन राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आले. या सरकारने जुलैमध्ये त्यापुर्वीच्या सरकारने मंजूर केलेल्या, पण काम सुरू न झालेल्या सर्व कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. यामुळे जवळपास सव्वा वर्षापासून या कामांना स्थगिती होती.

मागील महिन्यात राज्यात मोठी राजकीय घडामोड होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत सहभागी झाल्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या, पण स्थगिती दिलेल्या कामांवरील स्थगिती उठवण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे अन्न नागरी पुरवठा व ग्राहकसंरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने येवला ३३ कामांवरील स्थगिती महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने उठवली आहे.

येवला तालुक्यातील स्थगिती उठवलेली कामे व मंजूर निधी...
खरवंडी बंधारा१(५५ लक्ष ४० हजार)
खरवंडी बंधारा २ (६१ लक्ष ७९ हजार)
खरवंडी बंधारा ३( ६१ लक्ष ३४ हजार)
खरवंडी बंधारा ४ ( ५८ लक्ष ८० हजार)
खरवंडी बंधारा ७  (६२ लक्ष ६ हजार)
खरवंडी बंधारा ८ ( ६८ लक्ष २६ हजार)
खरवंडी बंधारा ९ ( ५६ लक्ष ६६ हजार)
खरवंडी बंधारा १० ( ७५ लक्ष ९ हजार)
खरवंडी बंधारा ११ (६२ लक्ष ३३ हजार)
रहाडी बंधारा ३ ( ६६ लक्ष २५ हजार)
रहाडी बंधारा ४ ( ७० लक्ष ४४ हजार)
रहाडी बंधारा ५ ( ६६ लक्ष ७१ हजार)
रहाडी बंधारा ६ ( ५८ लक्ष ७९ हजार)
रहाडी बंधारा ७ ( ४४ लक्ष ६ हजार)
रहाडी बंधारा ८( ५९ लक्ष ६७ हजार)
रहाडी बंधारा ९ (६० लक्ष ५६ हजार)
रहाडी बंधारा १० ( ६५ लक्ष ६३ हजार)
ममदापूर बंधारा १ ( ६० लक्ष ८ हजार)
ममदापूर बंधारा २ (६० लक्ष १६ हजार)
ममदापूर बंधारा ३ ( ६२ लक्ष ६ हजार)
ममदापूर बंधारा १० ( ६० लक्ष ४२ हजार)
ममदापूर बंधारा ११ ( ५० लक्ष ६१ हजार)
ममदापूर बंधारा १२ ( ४८ लक्ष ७० हजार)
ममदापूर बंधारा १३ ( ६६ लक्ष २७ हजार)
ममदापूर बंधारा १४ (५३ लक्ष ५७ हजार)
सोमठाण जोश बंधारा ५ ( ७० लक्ष १० हजार)
सोमठाण जोश बंधारा ६( ६२ लक्ष ७५ हजार)
सोमठाण जोश बंधारा ७ ( ५२ लक्ष ६ हजार)
सोमठाण जोश बंधारा ८ (६९ लक्ष २ हजार)
सोमठाण जोश बंधारा ९ ( ५७ लक्ष २६ हजार)
चांदगाव बंधारा १ ( ७२ लक्ष ८७ हजार)
चांदगाव बंधारा २ ( ७७ लक्ष ८४ हजार)
अनकाई बंधारा (९३ लक्ष ६५ हजार)