Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

जलवाहिनीच्या कामातील गौणखनिज विकून कोट्यवधींची रॉयल्टी बुडवली

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : सिन्नर (Sinnar) तालुक्यातील एका बंदिस्त जलवाहिनी योजनेचे काम करताना होणाऱ्या खोदकामातून बाहेर टाकला जाणारा हजारो ब्रास मुरूम ठेकेदाराकडून परस्पर विकला जात आहे. मुळात शेतकऱ्यांनी या कामासाठी कोणताही मोबदला न घेता या जलवाहिनीचे काम करण्यास परवानगी दिली असताना त्यांच्या जमिनीतून निघणारा मुरूम म्हणजे गौणखनिज परस्पर विकून आतापर्यंत सरकारची कोट्यवधींची रॉयल्टी बुडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गेले दोन-तीन वर्षांपासून हे काम सुरू असूनही त्या त्या भागातील तलाठी अथवा महसूल विभागातील इतर अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.

कोणतेही सरकारी काम केल्यानंतर त्या ठेकेदाराला देयक देताना रॉयल्टी कापून घेतली जाते. तसेच कोणत्याही खासगी कामासाठी गौणखनिज वाहतूक करण्यापूर्वी महसूल विभागाची परवानगी घेऊन त्याची रॉयल्टी भरणे आवश्‍वक असते. मात्र, सिन्नर तालुक्यातील देवनदीवरील कुंदेवाडी-सायाळे व कुंदेवाडी-खोपडी-मीरगाव या दोन बंदिस्त पूरपाणी योजनांचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे.

या बंदिस्त पूरपाणी योजनांमुळे देवनदीचे पाणी सिन्नरच्या पूर्वभागातील बंधाऱ्यांमध्ये सोडले जात आहे. या योजनेचे काम जवळपास तीन वर्षांपासून सुरू आहे. या बंदिस्त जलवाहिनीसाठी जवळपास सहा फूट व्यासाचे पाईप टाकले जात आहेत. यासाठी दहा मीटर खोल व पाच मीटर रुंद खोदकाम केले जात आहे.

या खोल चरामध्ये पाईप टाकल्यानंतर पुन्हा माती टाकून जलवाहिनी बुजवली जाते. मात्र, त्यातून मोठ्याप्रमाणावर गौणखनिज उरते. त्यातील थोडेफार गौणखनिज शेतमालक वापरत असला, तरी उरलेले गौणखनिक शेतात पडून राहणे शेतकऱ्याच्याही हिताचे नसते.

यामुळे ठेकेदार त्या गौणखनिजाची विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली खासगी व्यावसायिकांना सर्रासपणे विक्री करीत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. याबाबत नागरिकांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडेही तक्रारी केल्या. या गौणखनिजाच्या अवैध विक्रीत जलसंधारण विभागाच्या शाखा अभियंत्याचाही हात असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्याचे त्याची बदली करण्यात आल्याचे समजते. यानंतरही ठेकेदाराकडून या गौणखनिजाची विक्री सर्रासपणे सुरू असल्याचे दिसत आहे.

कुंदेवाडी-सायाळे या बंदिस्त जलवाहिनीचे काम जवळपास वीस किलोमीटरपर्यंत झाले आहे. या कामातून साधारणपणे पंचवीस हजार ब्रास गौणखनिज बाहेर पडले आहे. गौणखनिजावर सरकारकडून प्रतिबास सहाशे रुपये रॉयल्टी आकारली जाते. याचा विचार करता निव्वळ एका योजनेतून सरकारची जवळपास दीड कोटी रुपयांची रॉयल्टी बुडवण्यात आली आहे. अशाच प्रकारे दुसऱ्याही योजनेचे काम झाले असून त्यातून निर्माण होणाऱ्या गौणखनिजाचा विचार करता तितकीच रॉयल्टी तेथेही बुडाली आहे.

ठेकेदार कंपनीने हा मुरूम विक्री करून कोट्यवधी रुपये कमावले असून त्यातून सरकारची रॉयल्टी बुडवल्याचे त्या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत या नागरिकांनी वेळोवेळी तक्रारीही केल्या आहेत. मात्र, त्याची अद्याप कोणत्याही सरकारी यंत्रणेने दखल घेतली नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. या ठेकेदार कंपनीकडून या पाईपलाईनचे काम सुरू असताना सोबतच गौणखनिज वाहून नेण्यासाठी दोन-तीन हायवा तयार ठेवलेल्या आहेत. या हायवांच्या माध्यमातून