Pune-Pimpri Chinchwad Tendernama
पुणे

पिंपरी-चिंचवडमधील 'या' भागात का वाढतेय Real Estate मधील गुंतवणूक?

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवडच्या पूर्व भागात सध्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये अनेक नामवंत डेव्हलपर्स या भागात आपले गृहप्रकल्प सुरू करत आहेत. त्यामुळे त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुण्यानंतर पिंपरी चिंचवडच्या पूर्व भागात जमिनीची उपलब्धता गृहविक्री मार्केटद्वारे होणारी आर्थिक उलाढाल याचा डेव्हलपर्स आणि ग्राहक या दोन्ही घटकांकडून विचार केला जात आहे. सध्याचे घरांचे वाढते दर आणि भविष्यातील प्रॉपर्टीचे महत्व याची वैचारिक सांगड घालून प्रीमियम प्रॉपर्टी, लक्झरी विला, अलिशान बंगलो, बजेट होम यासह कमर्शियल शोरुम, शॉप खरेदीला या भागात प्राधान्य दिले जात आहे.

पिंपरी-चिंचवडचा पूर्व भाग भोसरी, मोशी, डुडुळगाव, चऱ्‍होली आणि आळंदी रस्ता परिसर सध्या घर खरेदीसाठी उत्तम पर्याय मानला जात आहे. पूर्व भागातील घरांचे दर पश्चिम भागाच्या तुलनेत खूपच परवडणारे आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबांना बजेटमध्ये चांगले फ्लॅट्स इथे सहज उपलब्ध होतात.

भोसरी, चाकण, रांजणगाव, तळवडे हे औद्योगिक परिसर पूर्व पट्ट्याला लागून आहेत. त्यामुळे या भागात काम करणाऱ्या नागरिकांसाठी जवळच घर असणे सोयीचे ठरते. महापालिका, पीएमआरडीए आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्याने रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण वाहिन्या, सार्वजनिक उद्याने, शाळा आणि दवाखाने या सुविधांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

पूर्व भागात मेट्रो, रिंग रोड आणि बस मार्गांमुळे ‘कनेक्टिव्हिटी’ वेगाने सुधारत आहे. आज खरेदी केलेल्या मालमत्तेची भविष्यात किंमत वाढणार आहे. त्यामुळे या भागात गृह खरेदीला चांगली पसंती मिळत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या पश्चिम भागाप्रमाणे पूर्वेकडे देखील मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. मोशी येथील इंटरनॅशनल एक्झिबिशन अॅण्ड कनव्हेन्शन सेंटर, डिस्ट्रिक्ट कोर्ट, चिखली येथील प्रस्तावित पोलिस आयुक्तालय, सीओईपी कॉलेज हे प्रकल्प या भागांतील विकासात भर घालणारे ठरत आहेत.

भामा आसखेड पाणी पुरवठा योजना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, एसटीपी हे प्रकल्प या भागाला विशेष महत्व निर्माण करुन देणार आहेत. त्याचबरोबर आळंदीचा आध्यात्मिक वारसा लाभल्यामुळेही घर खरेदी करण्यास नागरिकांची पसंती मिळत आहे.

असंख्य डेव्हलपर्स हे ग्राहकांच्या मागणीनुसार मोशी, चऱ्होली, डुडुळगाव भागांत प्रीमियम प्रॉपर्टी, लक्झरी विला, अलिशान बंगलो, बजेट होम यासह कमर्शियल शॉप्स तयार करुन देत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत हे उत्कृष्ट ‘डेव्हलपमेंट डेस्टिनेशन’ आहे. प्रकल्पातील दोन फेज पूर्ण असून तीस कुटुंबे वास्तव्यास आली आहेत. ग्राहकांच्या बजेटनुसार घराची रचना परिपूर्ण असावी अशी रचना आहे. या प्रकल्पात मध्यमवर्गीय व उच्चवर्गीय घटकाला प्राधान्य दिले. लाइफ स्टाइल इमारतीमध्ये ५० प्लस अॅमेनिटीज आहेत. या सोयी सुविधा वापरण्यायोग्य आहेत. घराचा एकोपा टिकवणाऱ्या अॅमेनिटीज आहेत. घर बुकींग करताना सॅम्पल फ्लोअर बनवल्यामुळे ग्राहकांचे स्वप्नातील घर कसे असणार ? याचे हुबेहूब चित्र समोर निर्माण होते. जे देणार आहोत, त्याचा अनुभव ग्राहकांना घेता येतो.

- संतोष कटारिया, संचालक, आदित्य बिल्डर्स

पिंपरी-चिंचवडच्या मध्यवर्ती म्हणजेच ‘हार्ट ऑफ सिटी’ भागात आपले प्रीमियम प्रोजेक्ट आहेत. दर्जेदार कन्स्ट्रक्शन क्वालिटी असणारे ८४० फ्लॅट्स ग्राहकांना हस्तांतरित केले आहेत. सध्या दोन फेज पूर्ण असून फेज तीन निर्माणाधीन आहे. ग्राहकांना टॉप टेरेस अॅमेनिटीज देतोय. टॉप टेरेस जीम, गार्डन अशा बहुतेक अॅमेनिटीज युनिक आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रीमियम प्रॉपर्टी हवी आहे. त्याच्या पसंतीचा चिंचवड येथील प्रोजेक्टमध्ये अंतर्भाव करुन प्रॉपर्टी देत आहोत. कमर्शियल प्रॉपर्टीसाठी सुद्धा ग्राहकांची चांगली पसंती आहे.

- घनशाम अगरवाल, संचालक, एम्पायर इस्टेट

चिंचवड येथील मध्यवर्ती ठिकाणी विशेषतः वाल्हेकरवाडी परिसरात सर्व सुविधांनी युक्त ३ बीएचके घरांची मागणी झपाट्याने वाढत आहे. रावेत आणि पुनावळे भागांपेक्षा अधिक मध्यवर्ती आणि सोयीस्कर ठिकाणी घर घेण्याचा कल वाढत आहे. ही वाढती मागणी लक्षात घेऊन आम्ही सर्व खर्चासह केवळ ८३ लाखांच्या आत दर्जेदार आणि आधुनिक सुविधांनी सजलेली घरे उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. स्वप्नातील घर शोधणाऱ्या प्रत्येकासाठी ही घरे एक परिपूर्ण निवड ठरतील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, हीच अपेक्षा.

- सचिन भालेराव, संचालक, अविरत डेव्हलपर्स