Railway
Railway Tendernama
पुणे

मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार; कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कामशेत स्थानकावरच्या (Kamshet Railway Station) लूप लाइनच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रवासी गाड्यांना आता लूप लाइन वरून धावताना वेग कमी करण्याची गरज नाही. त्यामुळे प्रवासी रेल्वेचे सात ते दहा मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

रेल्वे प्रशासनाने कामशेत स्थानकावर तीन दिवसांचा ब्लॉक घेऊन हे काम पूर्ण केले. अनेकदा मालगाडी ही मेन लाइनवर धावत असल्याने प्रवासी रेल्वे गाड्यांना पुढे काढण्यासाठी लूप लाइनचे आधार घेतला जात. पण कामशेत स्थानकावरची लांबी कमी असल्याने तिथून धावताना रेल्वेला गती कमी करावे लागत असे.

परिणामी प्रवासाचा वेळ वाढत होता. आता मात्र लूप लाइनचे विस्तारीकरण झाले असल्याने प्रवासी गाड्यांची वेळ वाचणार आहे.