Pune, PMC Tendernama
पुणे

Pune: 'ते' काम मुदतीपूर्वी पूर्ण करा! काय म्हणाले अजितदादा?

Pune: फुलेवाड्याच्या विस्तारीकरण आढावा बैठकीत काय म्हणाले उपमुख्यमंत्री?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महात्मा फुले वाड्याच्या विस्तारीकरणासाठी आवश्‍यक भूसंपादनाचे सर्वेक्षण महापालिकेने पूर्ण केले आहे. भूसंपादनापोटी जागामालकांना व भाडेकरूंना किती नुकसानभरपाई द्यायची, याबाबतचे धोरण तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

फुलेवाड्याच्या विस्तारीकरणाबाबत पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत दृक-श्राव्य माध्यमाद्वारे बैठक घेतली. त्यांनी फुले वाडा व लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या कामाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

याबाबत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले की, महात्मा फुले वाड्याच्या विस्तारीकरणासाठी सर्वेक्षण करण्यासाठी पथकाची नेमणूक केली होती. संबंधित पथकाने सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. त्याचा अहवाल तयार झाल्यानंतर बाधित होणाऱ्या जागेच्या मोबदल्यात जागामालक व भाडेकरूंना कशी व किती नुकसान भरपाई द्यायची, याबाबत धोरण निश्‍चित करण्यात येईल. या धोरणानुसार पुढील प्रक्रिया पार पडेल.

उपमुख्यमंत्री पवार यांनी लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या कामाचाही आढावा घेऊन कार्यवाहीबाबत सूचना दिल्या आहेत. साळवे यांच्या स्मारकाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही दिलेल्या मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.