PMRDA TP Scheme
PMRDA TP Scheme Tendernama
पुणे

Pune : पीएमआरडीएचा मोठा निर्णय; 'त्या' 2 भूखंडांचा होणार ई लिलाव

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : माण-हिंजवडी परिसरात पायाभूत शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) माण (ता. मुळशी) येथील दोन शैक्षणिक सुविधा भूखंड ८० वर्षांच्या दीर्घ मुदतीने भाडेपट्ट्याने ई-लिलावाद्वारे देण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण जमीन व मालमत्ता विभागाचे उपायुक्त रामदास जगताप यांनी दिली.

ई-लिलाव होणारे माण तालुका मुळशी येथील सं. नं. ९८/९९/१०१ मधील १३५ आर आणि सं.नं. २८८ मधील ६२ आर क्षेत्र हे दोन्ही भूखंड शैक्षणिक प्रयोजनासाठी आरक्षित केलेले सुविधा भूखंड आहेत. त्याचे ई लिलावासाठी इच्छुक असणाऱ्या शैक्षणिक संस्था अथवा धर्मादाय संस्थांना २४ जानेवारीपर्यंत ई-लिलाव पोर्टलवर (https://eauction.gov.in ) नोंदणी करता येईल. प्रत्यक्ष ई-लिलाव ३१ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होईल. त्यातून प्राधिकरणाला सुमारे २० ते २५ कोटींचा महसूल मिळणे अपेक्षित आहे.

या ठिकाणाच्या वापर संबंधित संस्थेला फक्त शैक्षणिक कारणासाठीच करता येईल, असे प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दोन्ही मोठे भूखंड माण-हिंजवडीच्या विकसित क्षेत्रात असल्याने या ठिकाणी उच्चदर्जाचे शैक्षणिक संकुल विकसित होण्यासाठी निश्चितच सहाय्यभूत ठरेल.