MPSC
MPSC Tendernama
पुणे

MPSC: आयोगाला हे शोभते का? का संतापले भरती प्रक्रियेतील उमेदवार?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : बीड जिल्ह्यातून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात आलो होतो. मागील सात वर्षांमध्ये चार वेळा ‘पदा’ने हुलकावणी दिली. त्यामुळे वयोमर्यादा लक्षात घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) लिपिक आणि कर सहायकांच्या भरतीत सहभागी झालो. आजवरच्या तयारीमुळे मुख्य परीक्षेत २५ गुणांचे ‘लीड’ मिळाले आहे.

मात्र, कौशल्य चाचणीतील अतीउच्च पात्रता निकष आणि तांत्रिक अडचणींमुळे हाता-तोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता आहे, असा अनुभव राजेश जाधव (नाव बदलले) या उमेदवाराने सांगितला. एक हजाराहून अधिक पात्र उमेदवारांनी टंकलेखन चाचणीबद्दल काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहे.

एमपीएससीने मार्च २०२३च्या पत्रकानूसार गट ‘क’ मुख्य परीक्षा २०२१ मधील मंत्रालयीन लिपिक टंकलेखक आणि कर सहायक संवर्साठी टंकलेखन चाचणी अनिवार्य केली आहे. त्यासाठी नुकतीच ७ एप्रिलला कौशल्य चाचणीही घेण्यात आली. मात्र, त्याच्या आठ दिवस आधिच नवीन टंकलेखन सॉफ्टवेअर पात्र उमेदवारांना देण्यात आले.

तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या नियमांना बगल देत. आयोगाने स्वतःच अतीउच्च निकष निश्चित केल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. लिपिक टंकलेखकासाठी तब्बल ९३ टक्क्यांचा पात्रता निकष अन्यायकारक असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

उमेदवारांचे आक्षेप...

- आठ दिवस आधी परीपत्रक बदलत नवे सॉफ्टवेअर का?

- प्रति मिनीटाला ३० शब्दांच्या टंकलेखनासाठी १५० शब्द अपेक्षीत असताना ३०० शब्द का?

- खराब किबोर्ड, शब्द बरोबर असतानाही अक्षरे लाल का?

- आयोगाची जाहिरात, मार्गदर्शक सूचना आणि प्रत्यक्षात अंमलबजावणीत फरक कसा?

- इतर परीक्षांना ३५ टक्के किंवा ६६ टक्क्यांचा पात्रता निकष असताना या परीक्षेला ९३ टक्के कसा?

- रेमिंग्टन मराठी किबोर्ड अपेक्षित असताना प्रत्यक्ष ‘रेमिंग्टन गेल’ कि-बोर्ड का?

उमेदवारांच्या मागण्या..

- परीक्षा केंद्रातील तांत्रिक अडचणीमुळे १८० विद्यार्थ्यांची पूनर्परीक्षा घेतली मंग इतरांची का नाही?

- पात्रतेचा निकष ९३ टक्क्यांहून ६० टक्के करावा

- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेसोबत विचार विनीमय करत न्याय नियम ठरवावे

- कौशल्य चाचणी घेणारी कंपनी जरी प्रमाणीक असली. तरी ती संबंधीत परीक्षेसाठी खरच परीपूर्ण आहे का, हे तपासावे

एकूण पदे...

मराठी टंकलेखन ः १०७७

इंग्रजी टंकलेखन ः १०२

कर सहायक ः २८५

उमेदवारांची निवड..

- परीक्षेला बसलेले ः ३ लाखांपेक्षा जास्त

- मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले ः १६,०००

- पात्रता परीक्षेसाठी निवड झालेले ः ३३००

आयोगाला खरंच बुद्धिमान अधिकारी हवेत का फक्त टंकलेखन करणारे कारकून? हा मोठा प्रश्न आहे. सॉफ्टवेअरमधल्या तांत्रिक अडचणी, अवाजवी उतारा आणि अतीउच्च पात्रता निकषामुळे अनेक गुणवंत उमेदवार अडचणीत सापडले आहे.

- सुयोग दातीर, (नाव बदलले)

रेल्वेच्या भरतीत दहा मिनीटांसाठी १२५० स्ट्रोक (कळ दाबण्याची क्रीया) गृहीत धरले जातात. आयोगाने तब्बल १६४० स्ट्रोकचा मजकुर दिला होता. त्यात लाल अक्षरे दिसण्याच्या प्रकारामुळे अनेक उमेदवारांची दिशाभूल झाली आहे.

- क्रांती जाधव (नाव बदलले)