Mantralaya Tendernama
पुणे

राज्याच्या क्रीडा विभागाने साहित्य खरेदीसाठी काढलेले टेंडर अखेर रद्द कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राज्याच्या क्रीडा विभागाने व्यायाम आणि क्रीडा साहित्याच्या खरेदीसाठी काढलेली तीन वर्षांसाठीचे टेंडर अखेर रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर क्रीडा विभागाने नवीन टेंडर प्रसिद्ध केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी पुण्यात याबाबत पत्रकार परिषद घेत टेंडरमधील संभाव्य भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. तसेच, टेंडर रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. माने यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले होते. त्याचबरोबर क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली, त्यानुसार शासन स्तरावर हे टेंडर रद्द करण्याच्या निर्णय घेण्यात आला आणि १७ जानेवारीला नवीन टेंडर प्रसिद्ध करण्यात आले.

या दोन्ही टेंडरसाठी काही विशिष्ट कंपन्या डोळ्यासमोर ठेऊन अटी घालण्यात आल्या असल्याचा संशय येत होता. ही दर करार निश्चिती तीन वर्षांची होणार असल्याने यात भ्रष्टाचार होणार असल्याचा आरोप माने यांनी पत्रकार परिषदेत केला होता.