Hinjawadi IT Park Tendernama
पुणे

Hinjawadi मधील रस्त्यांचा आता Water Park होऊ देऊ नका! मुंबईतील बैठकीत नेमके काय ठरले?

Mumbai: Hinjawadi आणि परिसरातील पायाभूत सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुंबईत झालेल्या बैठकीत देण्यात आल्या

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : मागील काही दिवसांपासून हिंजवडीतील (Hinjawadi) पायाभूत सुविधांचा कसा बोजवारा उडाला आहे, याची चर्चा सुरू आहे. देशात नव्हे तर जगातिक पातळीवर येथील राजीव गांधी महिती व तंत्रज्ञान पार्क (Rajiv Gandhi It Park Hinjawadi) प्रसिद्ध आहे. मात्र या परिसरात राहणाऱ्या आणि आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांना कुठल्या मरण यातनांचा सामना करावा लागतो आहे, हे मागील काही दिवसांतील बातम्यांमधून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर हिंजवडीतील नागरिकांसाठी एक चांगली बातमी आली आहे.

हिंजवडीतील (Hinjawadi) समस्यांसंदर्भात मुंबईत नुकतेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. हिंजवडी आयटी पार्क टप्पा एक, दोन व तीनचा समावेश करणारा सविस्तर हायड्रॉलिक अभ्यास आणि वादळी पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्याचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या प्रधान सचिवांसह पीएमआरडीए, एमआयडीसी आणि इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी व प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. सर्व विभागांनी समन्वय ठेवून तातडीने कामे करावीत, असे स्पष्ट करतानाच हिंजवडी परिसरातील समस्यांचा सखोल आभ्यास करून आवश्यक ती नियोजन कराण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.

हिंजवडीतील समस्या सोडविण्यासंदर्भात विविध ठराव मांडण्यात आले. पीडब्ल्यूडी किंवा एमआयडीसी भूसंपादन प्रक्रिया सुरू करतील आणि रस्ते आणि उड्डाणपुलांच्या विकास कामांमध्ये समन्वय ठेवतील. संबंधित एजन्सींनी तात्पुरती उपाययोजना म्हणून पर्यायी ड्रेनेज चॅनेलिंगचे काम तत्काळ हाती घ्यावे आणि सतत खड्डे दुरुस्तीचे काम करावे.

एमआयडीसी तातडीने १० टीपीडी एसडब्ल्यूएम सुविधा बांधेल. पीएमआरडीए संयुक्तपणे योग्य जमीन ओळखेल आणि एसडब्ल्यूएम प्रकल्पासाठी माण ग्रामपंचायतीला ती सोपवेल; सर्व विभागांनी पीसीएमसीकडून पीपीटी आणि नाला धोरणे मिळवावीत, संयुक्त अभ्यास करावा, एक व्यापक अंमलबजावणी अहवाल तयार करावा आणि त्यानुसार काम करावे, अशा ठरावांचा समावेश होता.