Solapur Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : 'ती' कामे अन् टेंडरसाठी 30 जानेवारीची डेडलाइन

Tender : २०२३-२४ या आर्थिक वर्षातील ६० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ४० टक्के कामांपैकी काही कामे अंतिम टप्प्यात आहेत.

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : २०२३-२४ या आर्थिक वर्षातील कामे व २०२४-२५ मधील कामांची टेंडर प्रक्रिया ३० जानेवारीपर्यंत पूर्ण करा, अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगल यांनी दिल्या.

सोमवारी (ता. १३) मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत बांधकाम समितीची बैठक झाली. या बैठकीत बांधकाम विभागाकडील कामांचा जंगम यांनी आढावा घेतला.

२०२३-२४ या आर्थिक वर्षातील ६० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ४० टक्के कामांपैकी काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. ती कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना बैठकीत जंगम यांनी दिल्या.

तसेच २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील कामांची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. ती तत्काळ पूर्ण करून त्या कामांनाही कार्यारंभ आदेश देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे यांच्यासह तालुकास्तरीय उपअभियंता उपस्थित होते.