Karhad
Karhad Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

'या' कारणामुळे कऱ्हाड पालिकेच्या उत्पन्नात पडली भर

टेंडरनामा ब्युरो

कऱ्हाड (Karad) : कऱ्हाड पालिकेच्या (Karad Municipal Corporation) शहरातील स्थावर मालमत्तेतील गाळ्यांपैकी मुदत संपलेल्या ५५० हून अधिक जुन्या गाळ्यांच्या फेरलिलावाचे बोली पद्धतीचे टेंडर (Tender) काढण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. ज्या गाळ्यांचे १५ ते ३० वर्षांपासून मुदतीप्रमाणे लिलाव झालेले नाहीत किंवा मुदत संपल्यानंतरही नूतनीकरण झालेले नाही, असे गाळेही फेरलिलावत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पालिकेने व्यापाऱ्यांना दुप्पट भाडे आकरणी केली होती. त्यातून पालिकेच्या उत्पन्नात तब्बल दोन कोटींची वाढ झाली आहे.

कऱ्हाड पालिकेने भाडे तत्वावर दिलेल्या गाळ्यांचे वर्षानुवर्षे भाडे तेच आहे. पालिकेने मध्यंतरी त्याचे सर्व्हेक्षण केले होते. त्यानुसार त्यात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेवून भाडेवाढीची आकराणी केली. नोटीसानुसार व्यापाऱ्यांनी दुप्पट भाडे भरले आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात दोन कोटींची भर पडली आहे. मार्च २०२१ पर्यंत पालिकेला गाळ्यांच्या भाड्यातून दोन कोटी ५० लाखांचा महसूल अपेक्षित होता. प्रत्यक्षात केवळ एक कोटी २६ लाखांचा महसूल जमा झाला. त्यात पालिकेने जनरल गाळ्यातून ५१ लाख ७६ हजार, आयूडीपीतील गाळ्यांतून ३२ लाख ८० हजार, आयूडीपी योजनेतील गाळ्यांतून २८ लाख ५८ हजार, तर यूडी सहा योजनेतील गाळ्यातून १३ लाख ७९ हजारांचा महसूल मिळाला. दोन कोटी ५० लाखांपैकी सव्वा कोटी थकीत होते. त्याचवेळी दुप्पट भाडेवाढ झाली.

दुप्पट भाडे आकारणीनुसार सध्या तरी पालिकेला दोन कोटींचे उत्पन्न नव्याने मिळाले आहे. शहरात तब्बल ७०४ गाळ्यापैकी जनरल योजनेतून २०८, आययूडीपीनेतून २३०, तर यूडी सहा योजनतून २६८ गाळे बांधले आहेत. पालिकेच्या गाळ्यांच्या स्थावर मालमत्तेत ६९८ गाळे आहेत. चार हॉल, तर दोन इमारती आहे.

पालिकेने दुप्पट कर आकारणीनंतर मुदत सपंलेल्या गाळ्यांच्या फेरलिलावाचे शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तब्बल 550 गाळ्यांची मुदत संपल्याचा सर्व्हेक्षण पालिकेने केले आहे. त्यामुळे त्यावर फेरलिलावच्या बोली टेंडरची 'कुऱ्हाड' कोसळणार आहे. त्या गाळ्यांचे तब्बल 15 ते 30 वर्षांपासून एकदाच करार झाले आहेत. १५ ते ३० वर्षे एकदाही लिलाव न झाल्याने त्याची मुदत संपली आहे. त्या गाळ्यांची माहिती घेवून मुदत संपलेल्या गाळ्यांचे पालिका फेरलिलाव करणार आहे. त्यातूनही नव्याने पालिकेला उत्पन्नाचा स्त्रौत निर्माण होणार आहे.

असे आहेत गाळे...

  • शनिवार पेठ - ३६३ गाळे व चार हॉल

  • गुरूवार पेठ - २९६ गाळे

  • बुधवार पेठ - २० गाळे

  • सोमवार पेठ - १६ गाळे व एक इमारत

  • मंगळवार पेठ - तीन गाळे

  • रविवार पेठ - एक इमारत