Airport Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Good News! अवघ्या 689 रुपयांत जा गोव्याला!

Solapur To Goa : सोलापूर ते गोवा या मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त ६८९ आहे. या मार्गावरही स्लॅबनुसार दर ८ हजार ७८५ पर्यंत जाऊ शकतात.

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : गोवा येथील फ्लाय ९१ (Fly 91) या विमानसेवा देणाऱ्या कंपनीने सोलापूर-गोवा (Solapur To Goa) आणि सोलापूर-मुंबई (Solapur To Mumbai) या फेऱ्या २३ डिसेंबरपासून सेवा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले असून संभाव्य दरपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामधील प्रारंभिक दर हे ट्रॅव्हल्सच्या दराइतकेच आहेत. प्रवासाच्या तारखेच्या किमान तीन ते चार महिने अगोदर तिकिटे काढल्यास दर अत्यंत कमी मिळतात.

अशीच बुकिंग केल्यास गोव्यासाठी अवघ्या ६८९ रुपयात तर मुंबईसाठी (Mumbai) एक हजार ४८८ रुपयात तिकीट उपलब्ध होणार आहे. त्यावर इतर कर व जीएसटीसह ही रक्कम ट्रॅव्हल्सच्या (Travels) दराइतकीच होणार आहे. फ्लाय ९१ ने संभाव्य दरपत्रक नुकतेच त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. हे संभाव्य दर स्वस्तात आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या बजेटमध्ये आहेत.

सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी फ्लाय ९१ कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भात मेलद्वारे माहिती मागितली आहे. त्यावर त्यांना संभाव्य दर मिळाले आहेत. फ्लाय ९१ च्या जनसंपर्क अधिकारी स्टेला फर्नांडिस यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता अधिकृत दर अद्याप निश्चित करण्यात आले नसल्याचे सांगितले.

सोलापूर ते मुंबई थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त १ हजार ४८८ पासून सुरू होतो. विविध स्लॅबमध्ये हे दर वाढत जातात जे प्रवाशांच्या मागणी व उपलब्धतेनुसार ठरवले जातात. जास्तीत जास्त दर ९ हजार ५८४ पर्यंत असू शकतात. अतिरिक्त शुल्कात २१७ रुपये युजर डेव्हलपमेंट फी (युडीएफ), २३६ रुपये विमान सुरक्षा शुल्क (एएसएफ) आणि ५ टक्के जीएसटी यांचा समावेश होतो.

सोलापूर ते गोवा या मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त ६८९ आहे. या मार्गावरही स्लॅबनुसार दर ८ हजार ७८५ पर्यंत जाऊ शकतात. अतिरिक्त शुल्क युडीएफ, एएसएफ आणि जीएसटी हे कर मुंबई मार्गाप्रमाणेच आहेत.

ट्रॅव्हल्सचे दर

सोलापूर गोवा

हमसफर ट्रॅव्हल्स १३५० रु.

कदंबा (सोलापूर-वास्को)८५० रु.

एसटी साधी (सोलापूर- पणजी)६९० रु.

सोलापूर - मुंबई

विश्वजित ट्रॅव्हल्स १००० रु.

जगदंबा ट्रॅव्हल्स ६०० रु.

कोलम ट्रॅव्हल्स १००० रु.

विमानाचे वेळापत्रक

मुंबई ते सोलापूर

निर्गमन : सकाळी ११: ५५

पोचणार : दुपारी १:४५

सोलापूर ते मुंबई

निर्गमन : सकाळी ९:४०

पोचणार : सकाळी ११:२०

गोवा ते सोलापूर

निर्गमन : सकाळी ८:००

पोचणार : सकाळी ९:१०

सोलापूर ते गोवा

निर्गमन वेळ : दुपारी २:१५

पोचणार वेळ : दुपारी ३:३०

सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल असून कंपनीच्या वतीने लवकरच बुकिंग सुरू होणार असल्याचा इमेल प्राप्त झाले आहे. सोलापूर विमानतळाच्या या नव्या सेवांमुळे धार्मिक तथा स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि व्यावसायिक प्रवाशांसाठीही ही सेवा वरदान ठरणार आहे.

- विजय जाधव, सदस्य, सोलापूर विकास मंच