Karhad
Karhad Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाडला सामान्य ठेकेदारांना टेंडर भरण्यावरून दमदाटी

टेंडरनामा ब्युरो

कऱ्हाड (Karhad) : येथील पालिकेची विविध कामाचे ई-टेंडर भरणाऱ्या सामान्य ठेकेदारांना दमदाटी केली जात आहे. त्या ई-टेंडरमध्ये स्थळ पाहणीची अट सक्तीची आहे, तरीही पालिका अधिकारी स्थळ पाहणीला ठेकेदाराला वेळ व अहवालही देत नाहीत. त्याउलट कोणत्या ठेकेदाराने कोणता ठका भरला आहे, त्याची माहिती पालिकेतील मतलबी लोकांना दिली जाते. तिच लोक सामान्य ठेकेदाराला बोलावून तुम्ही टेंडर भरायचे नाही, अशी धमकी देत ठेकेदारावर दबाव आणत आहेत. त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

राजाराम गणपत शिंदे, दिपक शांताराम पवार व दिनकर लक्ष्मण पाटील व अन्य ठेकेदारांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेसह राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. येथील पालिकेने विविध कामांच्या सरकारने ई-टेंडर काढले आहेत. संबंधित ठेकेदारांना तुलनात्मक टेंडर भरता यावी, हा उद्देश आहे. मात्र टेंडर भरताना धन दांडग्यांचा दबाव येऊ नये व गप्प बसावे लागते. येथील पालिकेच्या बांधकाम व जलःनिस्सारण विभागाकडून कामाची ई-टेंडर प्रसिद्ध झाले आहे. त्यात टेंडर भरण्यापूर्वी संबंधीत ठेकेदाराने पालिका प्रतिनिधींसह कामाची स्थळ पाहणी करून तसा दाखला पालिकेकडून घेण्याचा आहे. मात्र, ती अट नसून मेख आहे. त्यामुळे ठेकेदार स्थळ पाहणीला संबंधित आधिकाऱ्यांची विनवनी करत आहेत. तरिही अधिकारी टाळाटाळ करतात.

त्याउलट टेंडर भरायला आलेल्या ठेकेदारांची माहिती पालिकेतील काही मतलबी लोकांना ते देतात. ते मतलबी सामान्य ठेकेदाराला बोलावून तुम्ही हे कामाचे टेंडर भरावयाची नाही. ते काम दुसऱ्याला दिले आहे असा दबाव ठेकेदारावर आणत आहेत. त्यामुळे पालिका बदनाम होत आहे. पालिकेचे मुख्याधिकारीही बदनाम होत आहेत. नवीन ठेकेदारांना किंवा तुलनात्मक दर भरू इच्छिणाऱ्यांवरही अन्याय होत आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ई-टेंडरमध्ये अशी अट नाही. तरी पालिकेच्या कामासाठी तुलनात्मक दर यावेत, सर्व ठेकेदारांना विना दबाव टेंडर भरता यावी म्हणून वरील अट सुचनेतून रद्द करावी. पालिकेची सुचना पारदर्शक कारभारासाठी पालिकेच्या फायदयासाठी आणि सर्व ठेकेदारांना विना दबाव ई-टेंडर भरता यावी यासाठी आहे, त्याचा गांभिर्याने विचार व्हावा.