Panvel Municipal Corporation
Panvel Municipal Corporation Tendernama
मुंबई

पनवेल महापालिकेचे रस्त्यांच्या कामांसाठी 237 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पनवेल महापालिकेने सिडको वसाहतींमध्ये रस्त्यांच्या बांधकामासाठी २३७ कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. २७ किलोमीटर रस्त्यांसाठी महापालिका हा खर्च करणार आहे. यामध्ये १६ किलोमीटरचा मार्ग डांबरी आणि ११ किलोमीटरचा मार्ग कॉंक्रीटचा असणार आहे.

सिडको वसाहतींमध्ये रस्ते व इतर सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यावर महापालिकेने मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेतली आहेत. रस्त्यांच्या बांधकामाअंतर्गत खारघर बेलपाडा येथील अंडरपास ते एनआयएफटी महाविद्याालयापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण व इतर कामे करण्यासाठी ९ कोटी रुपये, बेलपाडा मेट्रो स्टेशन ते गणेश मंदिर सेक्टर- ५ ते उत्सव चौक रस्त्याचे व्हाईट टाेपॅग पद्धतीने काँक्रीटीकरण करणे, व पादचारी मार्गाचे उन्नतीकरण व इतर कामे करण्यासाठी १३ कोटी ८१ लाख, खारघर मधील लिटील वल्र्ड मॉल सेक्टर–२ ते उत्सव चौक रस्ता काँक्रिटीकरण करणे व रस्ते डांबरीकरण करून उन्नतीकरण व इतर कामांसाठी ८४ कोटी ४० लाख रुपये, कळंबोली येथील शीव-पनवेल महामार्गालगत सेक्टर- १ ते तळोजा लिंक रोड सेक्टर-१० ई पर्यंतचा मुख्य रस्ता काँक्रीटीकरण व इतर कामांसाठी ६५ कोटी २ लाख रुपये, कळंबोली येथील शीव पनवेल महामार्ग ते के. एल. ई कॉलेज सेक्टर- १ ते रोडपाली येथील सेक्टर-१२ तलावपर्यंत रस्त्याचे उन्नतीकरण व इतर कामांसाठी १५ कोटी ८८ लाख.

पनवेल महापालिकेचे प्रस्तावित मुख्यालय इमारत ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बपर्यंतच्या रस्ता उन्नतीकरण, काँक्रिटीकरण व इतर कामांसाठी ३६ लाख ७७ हजार रुपये, पनवेल शहरातील स्वामी नारायण मार्गावरील (न्यायाधीश निवास) ते ठाणा नाका रोडवरील मित्रानंद सोसायटीपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण व इतर कामांसाठी ६ कोटी ९२ लाख रुपये, नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर- १ एस येथील एच.डी.एफ.सी. बँक समोरील चौक व सेक्टर- ११ येथील क्रिकेट अ‍ॅकॅडमी समोरील चौक काँक्रीटीकरणासाठी ५ कोटी २७ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.